शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस फार चांगला माणूस, नाना पाटेकरांकडून फडणवीसांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 11:44 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फार चांगला माणूस आहे अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर यांनी फडणवीसांच्या कामकाजाचं कौतुक केलं आहे.

कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फार चांगला माणूस आहे अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर यांनी फडणवीसांच्या कामकाजाचं कौतुक केलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. नाना पाटेकर सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'आपला मानूस'च्या प्रमोशनात व्यस्त आहेत. कोल्हापुरात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते आला असता पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलं.

नाना पाटेकर यावेळी बोलले की, 'सध्याचा विरोधी पक्ष निवडणूक डोक्यात ठेवून काम करत असल्या कारणाने विधानसभा आणि लोकसभा चालू देत नाही. निवडणूक संपल्यानंतर दोघांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचं आहे'. यावेळी नाना पाटेकरांनी बाळासाहेबांच्या आठवणींचा उजाळा देत बाळासाहेबांनी मला मुलासारखं वाढवलं असं सांगितलं. बाळासाहेबांमुळे राज आणि उद्धव हे दोघेही माझ्या जवळचे आहेत असंही नानांनी यावेळी म्हटलं. बरेच वर्ष रेंगाळणारा सीमाप्रश्न लवकर सुटावा अशी अपेक्षाही यावेळी नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

राज यापुढेही माझा प्रेक्षक राहील, नाना पाटेकरांचा निर्वाळायाआधी पुण्यात बोलताना नाना पाटेकर यांनी राजकीय मंच आणि कलाकारांचा मंच वेगळा असतो. फेरीवाल्यांविषयी मला जे वाटते ते मी त्या वेळी राज ठाकरेंना बोललो. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे राज माझा कालही प्रेक्षक होता आणि यापुढेही राहील, अशा शब्दांत राज ठाकरे यांच्याशी असलेल्या वादावर पडदा टाकला. राजकारणात जाणार नसलो तरी नट म्हणून सतत व्यक्त होत राहीन, असेही नाना म्हणाले होते.

पत्रकारांशी बोलताना नाना म्हणाले, त्या वेळेस मी आपलेपणाच्या भावनेतूनच बोललो होतो. थोडी कुरबूर होत असतेच. त्या वेळचा विषय तेव्हाच सोडून द्यायचा असतो. त्यामुळे ते माझा आगामी चित्रपट नक्की पाहतील. मी कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही. त्यातूनही समजा गेलोच तर पक्षप्रमुखालाच शिव्या घालत आठवडाभरात सर्व पक्ष फिरून घरी बसेन. आज समाजात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. ती सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यामागे वाढती लोकसंख्या हे मूळ कारण आहे. लोकांनी माझी जात पाहून माझ्या अभिनयावर प्रेम केले नाही. प्रत्येकाच्या मनगटामध्ये जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन समाजाचा स्तर वाढविला पाहिजे.

प्रतिसेन्सॉर नको‘पद्मावत’ चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना नाना म्हणाले, चित्रपटाला एकदा सेन्सॉरने मान्यता दिल्यावर त्यावर प्रतिसेन्सॉर नसावा. आपला विरोध हा आपल्यापुरता मर्यादित ठेवावा. तरीही चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्यामुळे त्यावर सेन्सॉर हवाच, असेही पाटेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस