शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री की गुजरातचे?, सुषमा अंधारेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 16:25 IST

फडणवीस सूडबुद्धीचे, पक्षपाती राजकारण करत असल्याचा आरोप

उद्धव गोडसेकोल्हापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप करत, फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे? असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. आज, बुधवारी (दि. १६) कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सध्या राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे कोल्हापुरात आल्या आहेत. काल, कुरुंदवाड येथे त्यांची जाहीर सभा झाली. आज, बुधवारी त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. 'महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्याचा डाव भाजपकडून सुरू आहे. फडणवीस यांच्या पुढाकारातूनच महाराष्ट्राला कंगाल केले जात आहे, त्यामुळे फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे आहेत?' असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. तसेच भाजपची महाराष्ट्रद्रोही भूमिका महाप्रबोधन यात्रेतून उघड करत राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.महाराष्ट्रात २०२३ मध्ये मध्यावधी निवडणुका लागतील, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला. शिंदे गटातील फुटीर आमदारांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे आमदारांमधील अस्वस्थता वाढली आहे. त्यातून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असेही त्या म्हणाल्या.फडणवीस सूडबुद्धीचे, पक्षपाती राजकारण करत असल्याचा आरोपआमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईवर बोलताना अंधारे यांनी  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सूडबुद्धीचे आणि पक्षपाती राजकारण करत असल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह डॉ. सुजित मिणचेकर, रविकरिण इंगवले, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस