कार्यकालात सव्वादोन कोटींची विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:00+5:302021-01-08T05:19:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनामुळे कमी कार्यकाल मिळूनही त्यामध्ये महिला महोत्सवाचे आयोजन केले. तसेच सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची ...

Development works worth Rs | कार्यकालात सव्वादोन कोटींची विकासकामे

कार्यकालात सव्वादोन कोटींची विकासकामे

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोनामुळे कमी कार्यकाल मिळूनही त्यामध्ये महिला महोत्सवाचे आयोजन केले. तसेच सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची विकासकामे केली, अशी माहिती महिला व बालकल्याण सभापती शुभांगी प्रधान माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्या म्हणाल्या, महिलांचा सन्मान करणारे महिला महोत्सव २०२० चे आयोजन करून स्टॉल उभारणीचे रेकॉर्ड मोडले. त्यामधून अनेक महिलांना आर्थिक उत्पन्न मिळाले. तसेच बगीचा सुशोभिकरण, बालोद्यानाचा विकास, सुंदर बागेत खेळणी बसविणे, शहरात ओपन जीम उभारणी करणे, महात्मा गांधी उद्यानात ट्रॅक तयार करणे, कंपाऊंड दुरूस्ती, रंगकाम, पेव्हींग ब्लॉक बसविणे अशी विविध कामे पूर्णत्वास नेली आहेत. याकामी मुख्याधिकारी संतोष खांडेकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक मदन कारंडे, माजी आमदार अशोक जांभळे, पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, उदयसिंह पाटील, शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Development works worth Rs