विकास कामांची पोकळी भरून काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:21+5:302021-01-08T05:21:21+5:30
कुरुंदवाड : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने विकासासाठी निधी मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनाची तीव्रता कमी झाली ...

विकास कामांची पोकळी भरून काढणार
कुरुंदवाड : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने विकासासाठी निधी मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनाची तीव्रता कमी झाली असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून गेल्या चार वर्षातील विकास कामांची पोकळी भरून काढणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी केले.
शहराच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि नामकरण सोहळाप्रसंगी पालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष धनपाल आलासे होते.
प्रारंभी नव्याने बांधलेल्या पालिका सभागृहाचे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह असे नामकरण, औद्योगिक वसाहतीतील छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि ऐतिहासिक कृष्णा घाटाचे नूतनीकरण, तसेच सरसेनापती संताजी घोरपडे नामकरण करून त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष पाटील व नगरसेवकांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी धनपाल आलासे, प्रा. सुनील चव्हाण, बाळासाहेब गायकवाड, रघू नाईक, डॉ. नितीन घोरपडे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास उपनगराध्यक्षा मुमताज बागवान, विजय पाटील, दीपक गायकवाड, फारुख जमादार, प्रफुल्ल पाटील, जवाहर पाटील, अक्षय आलासे, तानाजी आलासे, प्राजक्ता पाटील आदी उपस्थित होते.
फोटो - ०४०१२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ -
कुरुंदवाड येथे विविध विकास कामांचे उद्घाटन नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी मुमताज बागवान, विजय पाटील, दीपक गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.