वसाहतीचा विकास, समाजाची प्रगती हाच ध्यास--परिवर्तनाच्या वाटेवर

By Admin | Updated: December 19, 2014 23:51 IST2014-12-19T23:41:16+5:302014-12-19T23:51:54+5:30

पंचमंडळीचा निर्धार : पर्यटनासाठी परदेशवारीची तयारीं; महिलाही संघटित; १४ महिला बचत गटांची स्थापना--पारधी समाज

Development of the colonies, the advancement of society is the only solution - on the path of change | वसाहतीचा विकास, समाजाची प्रगती हाच ध्यास--परिवर्तनाच्या वाटेवर

वसाहतीचा विकास, समाजाची प्रगती हाच ध्यास--परिवर्तनाच्या वाटेवर

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर
व्यसने सुटली, संस्कार रुजू लागले की कोणतेही घर अथवा समाज आपोआपच विकासाच्या वाटेवर जातो. उचगाव येथील फासेपारधी वसाहतीचेही तसेच झाले.
समाजातील नागरिकांना व्यसनापासून परावृत्त करताना, स्वच्छता मोहीम राबविताना वसाहतीचा नियोजनबद्ध विकास करणे, समाजबांधवाना शिक्षणाची गोडी लावत त्यांची आर्थिक उन्नती साधणे हेच उद्दिष्ट गणेश काळे यांच्यासह पंचमंडळींनी समोर ठेवले होते. किंबहुना त्याचा ध्यासच घेतला होता. त्याचेच फलित आज दिसत आहे. गावापासून दोन किलोमीटरवर असलेल्या बारा एकर जागेत फासेपारधी वसाहतीमध्ये नियोजनबद्ध विकासकामे केली जात आहेत. शासनाकडून आलेल्या निधीचा पारदर्शकपणे वापर करून श्रमदानाची जोड देत सर्वच कामे केली जातात. उच्चवर्णीय वसाहतीमधील लोकांना हेवा वाटावा, असा विकासाचा ‘चेहरा’ दिला आहे. (समाप्त)


वर्दळ वाढली
‘लोकमत’ने या वसाहतीवर प्रकाशझोत टाकल्यानंतर रोज कोल्हापूर व पंचक्रोशीतील दहा ते बारा लोक आमच्या वसाहतीला भेट देत आहेत. विविध उपक्रमांची माहिती जाणून घेत आहेत. उद्या, शनिवारी टेंबलाईवाडीतील प्रियदर्शनी कॉलनीतील लोक येणार आहेत.
- आप्पाजी पोवार, रहिवासी



आदर्शवत कामगिरी...
ग्रामपंचायतीतर्फे फासेपारधी वसाहतीच्या विकासासाठी कायमच सहकार्याची भूमिका राहिली आहे. वसाहतीमध्ये एकजूट असल्यामुळे सर्वच योजना चांगल्या राबविल्या जातात. लोकसहभागातून त्यांनी वसाहतीचा कायापालट केला आहे. वसाहतीमधील चांगल्या विकासकामांमुळे गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वसाहतीचा सर्वांनीच आदर्श घेण्याची गरज आहे.
- सौ. सुरेखा चौगुले, सरपंच, उचगाव



महिला संघटित..
वसाहतीमध्ये १४ महिला बचतगट कार्यरत आहेत. या माध्यमातून १७० महिला संघटित आहेत. २० ते ३० लाख रुपयांचे भागभांडवल बचत करून संकलित केले आहे. बचतगटातर्फे वसाहतीमध्ये मोठे किराणा व अन्य वस्तूंचे दुकान घालण्याची तयारी सुरू आहे.

Web Title: Development of the colonies, the advancement of society is the only solution - on the path of change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.