देवस्थानचा देवल क्लबसोबतचा करार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:27 IST2021-09-12T04:27:36+5:302021-09-12T04:27:36+5:30
नागरिकांना अत्यल्प दरात आरोग्य तपासणी करून मिळावी यासाठी देवस्थान समितीने पॅथाॅलॉजी लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. न्याय व ...

देवस्थानचा देवल क्लबसोबतचा करार रद्द
नागरिकांना अत्यल्प दरात आरोग्य तपासणी करून मिळावी यासाठी देवस्थान समितीने पॅथाॅलॉजी लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. न्याय व विधि खात्याची परवानगी मिळण्याआधीच देवल क्लबची इमारत भाड्याने घेऊन त्यासाठी तीन वर्षांचा करार करण्यात आला. गेली दोन वर्षे वापराविना भाड्यापोटी समितीने १५ लाखांवर रक्कम भरली आहे. शिवाय अनामत ४५ लाख रुपये देण्यात आले आहेत.
हा विषय गांभीर्याने घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हा भाडेकरार रद्द करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी म्हणून लॅबसाठी ही जागा भाड्याने घेण्यात आली होती. त्यासाठी खूप मोठी रक्कम अनामत देण्यात आली होती व वापराविना भाडे भरले जात होतो; पण लॅबसाठी न्याय व विधि खात्याने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे हा करार रद्द करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे देवल क्लबचीदेखील सोय झाली आहे. देवस्थानकडून विषय मिटवला जात नव्हता. दुसरीकडे करार झाल्याने क्लबलादेखील काही निर्णय घेता येत नव्हता. व्यावसायिक संस्थांकडून जास्त भाडे मिळत असताना देवल क्लबने देवस्थानसाठी म्हणून हा करार केला होता. आता करार रद्द झाल्याने देवल क्लबलादेखील अन्य पर्याय उपलब्ध झाले आहेत.
----