शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानने मोरेवाडीतील ३ एकर जमीन घेतली ताब्यात अंबाबाईची मालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 15:51 IST

देवस्थानच्या अटी व शर्तींचा भंग केल्याने मोरेवाडी (ता.करवीर) येथील ३ एकर ६ गुंठे (एक हेक्टर २६ आर) जमीन आर. एल. तावडे फौंडेशनच्या किशोर तावडे यांच्याकडून समितीने गुरुवारी ताब्यात घेतली. ही जमीन करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मालकीची असून त्यावर बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेल्या इमारतीला सील करण्यात आले.

ठळक मुद्देदेवस्थानने मोरेवाडीतील ३ एकर जमीन घेतली ताब्यात अंबाबाईची मालकी शर्तींचा भंग केल्याने केली कारवाई

कोल्हापूर : देवस्थानच्या अटी व शर्तींचा भंग केल्याने मोरेवाडी (ता.करवीर) येथील ३ एकर ६ गुंठे (एक हेक्टर २६ आर) जमीन आर. एल. तावडे फौंडेशनच्या किशोर तावडे यांच्याकडून समितीने गुरुवारी ताब्यात घेतली. ही जमीन करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मालकीची असून त्यावर बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेल्या इमारतीला सील करण्यात आले.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची मोरेवाडी येथे गट नं ५३, ५५, ५६, ५७ येथील ही जमीन आर. एल. तावडे फौंडेशनतर्फे किशोर तावडे यांना २००७-०८ मध्ये एक वर्षासाठी शेती करण्यासाठी देण्यात आली होती. मात्र तावडे यांनी गट नं ५७ मध्ये आरसीसी इमारत व गट नं ५६ मध्ये वीट बांधकाम करून पत्र्याचे शेड बांधल्याचे २०१२ साली निदर्शनास आले. तेव्हापासून समितीने जागा परत मिळावी यासाठी तहसिलदारांमार्फत वारंवार पत्रव्यवहार केला होता.

नोटिसा पाठवल्या होत्या. अखेर या जमिनीची समितीने भूमी अभिलेख कार्यालय करवीर यांच्यावतीने शासकीय मोजणी करून घेतली, असे या मिळकतीत तावडे यांनी विनापरवाना बांधकाम करून शर्तभंग केल्याचे सिद्ध झाले.मिळकतीबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत देवस्थान समितीने विधि सल्लागार अ‍ॅड. ए. पी. पोवार यांचा सल्ला घेतला व त्यानुसार या जमिनीचा कब्जा घेण्यासाठी महसूल विभागाशी पत्रव्यवहार केला. अखेर गुरुवारी दुपारी महसूल विभागाच्या वतीने मंडल अधिकारी स्वरूप पाटील यांनी या जागेचा पंचनामा करून इमारत सील केली व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या ताब्यात किल्ल्या व कागदपत्रे दिली. यावेळी आर. एल. फौंडेशनतर्फे स्वत: किशोर तावडे समितीचे सचिव विजय पोवार, उपसचिव शिवाजी साळवी, उपअभियंता सुयश पाटील, मिलिंद घेवारी आणि कर्मचारी उपस्थित होते.हातकणंगलेत सर्वाधिक अतिक्रमणेदेवस्थानच्या बहुतांशी जमिनींवर अटी व शर्तींचा भंग करून बेकायदेशीररित्या अतिक्रमणे करण्यात आली आहेत. त्यात हातकणंगले तालुक्यात सर्वाधीक प्रमाण आहे. अशा सर्व कुळांना समितीने नोटिसा काढल्या आहेत. काही जमिनी पून्हा समितीच्या ताब्यात आल्या आहेत.

जमिनींची ८२ प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत. सध्या स्टार आयटी कंपनीकडून समितीच्या ताब्यातील ३०४२ मंदिरे, २३ तालुके व १६०० गावांतील जमिनींचा सर्व्हे सुरू आहे. त्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. या सर्व्हेनंतर समितीच्या नेमक्या किती जमिनींवर अतिक्रमण झाले आहे हे लक्षात येईल.

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरMahesh Jadhavमहेश जाधव