देवानंद शिंदे ‘लोकप्रिय कुलगुरू’
By Admin | Updated: November 11, 2016 00:10 IST2016-11-10T23:17:51+5:302016-11-11T00:10:01+5:30
वॉक्हार्ट फाउंडेशनचा पुरस्कार : ३४ हजारांहून अधिक मते

देवानंद शिंदे ‘लोकप्रिय कुलगुरू’
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची वॉक्हार्ट फाउंडेशनच्या ‘एज्युकेशन पॉप्युलर अवॉर्ड २०१६’साठी ‘लोकप्रिय कुलगुरू’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याची घोषणा फाउंडेशनने संकेतस्थळावर गुरुवारी केली.
वॉक्हार्ट फाउंडेशन ही सामाजिक व आरोग्य सेवा क्षेत्रांत कार्यरत असलेली एक अग्रमानांकित अशासकीय संस्था आहे. त्यांच्यातर्फे दरवर्र्षी विविध क्षेत्रांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या देशभरातील मान्यवरांची ज्यूरींमार्फत निवड करण्यात येते. त्यांपैकी एकास पुरस्काराने गौरविले जाते.
‘लोकप्रिय कुलगुरू’ या पुरस्कारासाठी ज्यूरी पॅनलने देशभरातून राज्य विद्यापीठांचे दोन, केंद्रीय विद्यापीठाच्या एक, महिला विद्यापीठाच्या एक व खासगी विद्यापीठाच्या एक अशा पाच कुलगुरूंची अंतिम फेरीत निवड केली होती. अंतिम लोकप्रियता फेरीत मिस्ड कॉलद्वारे जनमत अजमावण्यात आले. यात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना सर्वाधिक ३४ हजार ५३६ मते मिळाली. अन्य शैक्षणिक पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये दीप्ती दत्त, अरविंद पनगारिया, आनंदकमल मिश्रा, डॉ. के. कस्तुरीरंगन, भास्कर राममूर्ती, जनत शाह यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)