हुपरी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्धार
By Admin | Updated: March 12, 2015 23:54 IST2015-03-12T21:15:23+5:302015-03-12T23:54:50+5:30
‘नगरपालिका कृती समिती’च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे व याप्रश्नी न्यायालयीन लढाईबरोबर रस्त्यावरील लढाही लढून याठिकाणी

हुपरी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्धार
हुपरी : शासनाच्या लालफितीच्या कारभारात व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली हुपरी
(ता. हातकणंगले) ची नगरपालिका अस्तित्वात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘नगरपालिका कृती समिती’च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे व याप्रश्नी न्यायालयीन लढाईबरोबर रस्त्यावरील लढाही लढून याठिकाणी ‘नगरपालिका’ स्थापन करण्यास भाग पाडण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या रौप्यनगरीवासीयांनी घेतला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती किरण कांबळे होते.हुपरीची लोकसंख्या ५५ हजारांवर आहे. चांदी उद्योगाबरोबरच औद्योगिकीकरणामुळे शहराचा विस्तार वाढला आहे. परिणामी लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला अशक्य झाले आहे. यासाठी येथील नागरिकांचा नगरपालिकेसाठी आग्रह सुरू आहे. यासाठी गुरुवारी कृती समितीच्यावतीने बैठक घेण्यात आली. सरपंच दीपाली शिंदे, मंगलराव माळगे, अशोक खाडे, शरद मिराशी, किरण कांबळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. निमंत्रक अमजद नदाफ, सुदर्शन खाडे, गणेश कोळी, दौलत पाटील, धर्मवीर कांबळे, राजेश होगाडे, प्रतापसिंह देसाई, नितीन गायकवाड, उपस्थित होते. लालासाहेब देसाई यांनी स्वागत, बाळासाहेब कांबळे यांनी प्रास्ताविक, मुबारक शेख यांनी सूत्रसंचालन, तर रघुनाथ नलवडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)