विनाकारण मोटारसायकलवरून फिरणारा एक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:24 IST2021-05-10T04:24:23+5:302021-05-10T04:24:23+5:30
इचलकरंजी : येथील राजवाडा चौकात विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱ्या एकास शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहन अभिमन्यू कुरणे (वय ...

विनाकारण मोटारसायकलवरून फिरणारा एक ताब्यात
इचलकरंजी : येथील राजवाडा चौकात विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱ्या एकास शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहन अभिमन्यू कुरणे (वय २३, रा. टाकवडे वेस) असे त्याचे नाव आहे. रोहन याने पोलिसांच्या अंगावर जाऊन अरेरावी भाषा करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार प्रभाकर कृष्णा दिवटे (वय ५१) यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरात संचारबंदी असूनही अभिमन्यू हा राजवाडा चौकामध्ये विनाकारण फिरत होता. त्यावेळी शहर वाहतूक पोलिसांनी त्याची मोटारसायकल (एमएच ०९ ईजे ३९६०) बाजूस घेण्यास सांगितले. त्यावेळी त्याने मोटारसायकलला हात लावायचा नाही, हात लावाल तर बघा, अशी धमकी दिली. दरम्यान, त्याची मोटारसायकल पोलीस बाजूला घेत असताना रोहन त्यांच्याशी अरेरावी भाषा करीत अडथळा आणला.