शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दलित विरुद्ध मराठा असा रंग देणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावा : खासदार संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 14:57 IST

नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने त्यांचा कुटील डाव उधळून लावला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर दिली आहे.

ठळक मुद्देदलित विरुद्ध मराठा असा रंग देणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावा : खासदार संभाजीराजेअरविंद बनसोड आणि इतरांना न्याय मिळाला पाहिजे

कोल्हापूर : नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने त्यांचा कुटील डाव उधळून लावला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर दिली आहे.नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या सोशल मिडियावर येत आहेत. या विषयावर खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे, की बहुजन समाजामध्ये फूट पाडून, जाती जातींमध्ये भांडणे लावून, स्वत:च्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायला काही लोक पुढे सरसावत आहेत, पण यामधून त्यांचं क्षुल्लक राजकारण साध्य होईल, पण समाजाचं मोठं नुकसान होणार आहे.

चौकशीअंती या घटनांमध्ये जे दोषी आहेत, त्यांच्यावर तत्काळ अन कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा समाजाने दलितांवर अन्याय करु नये, परंतु त्याच वेळी काही कायद्यांचा चुकीचा वापर करून मराठा समाजावर सुद्धा अन्याय करु नये. जर अशाप्रकारे कुणावरही अन्याय होत असेल तर त्याचा मी तत्काळ विरोध केला आहे आणि करत राहणार, असेही त्यांनी म्हटले आहे.काही माथेफिरु लोक दोन्हीकडे असतात. त्या सर्वांना आपण बाजूला पाडलं पाहिजे. समाज हिताच्या दृष्टीने, बहुजन समाजाच्या एकीच्या दृष्टीने तेच योग्य आहे. देशाच्या सामाजिक एकात्मतेला सुरुंग लावणाऱ्या शक्तींचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या केवळ घोषणा देऊन काय उपयोग? त्यांचे विचार आत्मसात करणे, त्याप्रमाणे वागणे महत्वाचे आहे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर व्यक्त केले आहे.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडिया