शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
2
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
3
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
4
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
5
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
6
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
7
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
8
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
9
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
10
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
11
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
12
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
13
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
14
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
15
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
16
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
17
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
18
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
19
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
20
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
Daily Top 2Weekly Top 5

IndiGo: कोल्हापूर विमानतळावर उड्डाणे वेळेत, दरही आवाक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:22 IST

विमानांचे दर अव्वाच्या सव्वा लावल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप

कोल्हापूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून इंडिगो कंपनीच्या विमानसेवेत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाल्याने त्याचा गैरफायदा घेत इतर विमान कंपन्यांनी त्यांच्या विमानांचे दर अव्वाच्या सव्वा लावल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, कोल्हापूरविमानतळावरून उड्डाण करणाऱ्या सर्वच विमान कंपन्यांचे दर नियमित दरासारखेच होते. यात एकही रुपयाची वाढ केली नसल्याने प्रवाशांना विनासायास प्रवास करता आला.कोल्हापूर विमानतळावरून रोज ५०० प्रवाशांची ये-जा होते. या विमानतळावरून मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, अहमदाबाद या मार्गांवर सेवा दिली जाते. आठवड्यातून चार दिवस चार, तर तीन दिवस रोज विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होते. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील प्रवासीही मुंबईला जाण्यासाठी याच विमानतळावर येतात. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत या विमानतळावरून लाखो प्रवाशांनी प्रवास केला आहे. तीन वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत कोल्हापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू आहे. चार-पाच दिवसांपूर्वी इंडिगो कंपनीची सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. कोल्हापूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसला. मात्र, रविवारपासून येथील सर्वच विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग वेळेत झाले आहे. कोल्हापूर ते मुंबई या प्रवासासाठी चार हजारांपासून पुढे सात-आठ हजार रुपयांपर्यंतचे तिकीट दर आहे. इंडिगोच्या सेवेमुळे देशभरात अनेक ठिकाणी विमान कंपन्यांनी त्यांच्या नियमित दरापेक्षा वाढ केली. मात्र, कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-बंगळुरू, कोल्हापूर-हैदराबाद या मार्गांवर जाण्यासाठी पूर्वी जितके तिकिटाचे दर होते, तेच दर या काळातही कायम ठेवण्यात आले आहेत.

कोल्हापूर विमानतळावरील विमानांचे नियोजन रविवारपासून सुरळीत सुरू आहे. विमानतळ प्राधिकरणने घालून दिलेल्या नियमानुसारच तिकिटाचे दर आहेत. यात एक रुपयाचीही वाढ केलेली नाही. -अनिल शिंदे, संचालक, विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Airport: IndiGo Flights on Time, Affordable Fares Maintained

Web Summary : Despite IndiGo's disruptions and inflated fares elsewhere, Kolhapur Airport maintained regular ticket prices. Flights to Mumbai, Bangalore, and Hyderabad remained affordable, benefiting approximately 500 daily passengers. Airport operations have normalized since Sunday, ensuring smooth travel for passengers from nearby districts.