शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उरूसावर बंदी, तरीही विशाळगडावर गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:47 IST

तपासणी पथकाद्वारे प्रत्येकाला नंबरचा बिल्ला देऊन गडावर सोडले

आंबा : बकरी ईदनंतर होणाऱ्या विशाळगडावरील उरूसास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली असली, तरी रविवारी गडावर सुमारे तीन हजारांवर भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दर्गा, भगवा चौक, मुंडा दरवाजा, चांद इमारत भागात भाविकांनी गर्दी केली होती. काही भाविकांनी कोंबड्यांची कुर्बानी दिली. देवदर्शनापेक्षा पोलिसी तपासणीच्या रांगा मोठ्या होत्या. बसमधील प्रवासी तपासणीस स्वतंत्र पथक कार्यरत होते.गडापासून पाठीमागे आठ किलोमीटर वरील केंबुर्णेवाडी येथे पोलिसांनी पहिले तपासणी पथक उभारून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची व भाविकांची कसून चौकशी करून गडाकडे सोडले जात होते. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत देवदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने मुभा दिली. चार वाजताच गडावरील खोल्यातून व गडपरिसरातून तपासणी पथकाने भाविकांना बाहेर काढण्याची जणू मोहीमच राबवली. सहानंतर गडावर सामसूम पसरली.काल ईदनिमित्त बंदोबस्तात असलेली पोलिस कुमक ठिकठिकाणी पहारा देत होती. न्यायालयाच्या अटी व शर्तीशी बांधील राहून देवदर्शन झाले. नमाज पठण पार पडले. तुरबतीवर फुलांच्या चादरी अर्पण करण्यात आल्या.न्यायालयाच्या निर्देशानुसार रणमंडळ टेकडी समोरील मुबारक मुजावर यांच्या खासगी जागेत पत्राचे बंदिस्त शेड उभारून कोंबडीच्या कुर्बाणीस मुभा दिली गेली. येथे स्वच्छतेची मोठी दक्षता घेतली होती. पोलिस व आरोग्य पथकेही सज्ज होते. पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, पोलिस निरीक्षक विजय घेरडे, प्रभारी तहसीलदार गणेश लव्हे लक्ष ठेवून होते.दोन टप्प्यांत कसून चौकशीदेवदर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविकांचे आधार कार्ड, मोबाइल नंबर, गाडी नंबर व चालकाचा गाडीसह फोटो काढणारी यंत्रणा केंबुर्णेवाडी येथे सज्ज होती. शिवाय गडावर चढताना पायथ्याला दुसऱ्या तपासणी पथकाद्वारे प्रत्येकाला नंबरचा बिल्ला देऊन गडावर सोडले जात होते. हामालांचे हात मोकळेच..गडावर चढून जाण्यास चढणीचा मार्ग असल्याने भाविकांचा बोझा नेण्यास गजापूर, भाततळी भागातील हमाल स्त्री-पुरुष पायथ्याला सज्ज होते, पण बहुतेक भाविक मोकळेच आल्याने हमालांना रोजगार मिळाला नाही. महिला हमाल हात हालवित घरी परतल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर