शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेचे पुढचे पाऊल, कोल्हापुरात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबरला मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:40 IST

एकनाथ शिंदे यांनी लोकसभा, विधानसभेला जिल्ह्यात तळ ठोकला होता

कोल्हापूर : एक खासदार, एक पालकमंत्री, दोन आमदार आणि एक पाठिंबा दिलेले आमदार यांच्या पाठबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ताकद दाखवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सज्ज झाले आहेत. त्यामुळेच ८ ऑक्टोबरला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून शिंदे स्वत: या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.महायुती म्हणून तीन पक्ष कार्यरत असताना जोपर्यंत चिन्हावरचे किंवा आपल्याला मानणारे जादा जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य किंवा नगरसेवक निवडून येत नाहीत तोपर्यंत ताकद निर्माण होत नाही याची पक्की जाणीव शिंदे यांना आहे. त्यामुळेच त्यांनी लोकसभा, विधानसभेला कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकला होता. अडचणीतील आपल्या उमेदवाराला हात देण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला होता. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी निवडणुकाच महत्वाच्या असून त्या माध्यमातूनच कार्यकर्त्यांना पदे देता येत असल्याने त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक गांभीर्याने घेतल्या आहेत.

कोल्हापुरात शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे. राजेश क्षीरसागर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. त्यामुळे आबिटकर यांच्याकडे शिंदेसेनेच्या जिल्ह्यातील निवडणुकांची जबाबदारी असून क्षीरसागर यांच्यावर प्रामुख्याने कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आहे. या दोघांनीही जोडण्या लावत अनेक मान्यवरांना शिंदेसेनेत आणले आहे. खासदार धैर्यशील माने यांच्यावर इचलकरंजी महापालिका आणि त्यांच्या मतदारसंघातील नगरपालिका, नगरपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार, आमदारांच्या निवडणुका झाल्या आहेत. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केल्याचेही सांगण्यात येत आहे.येणाऱ्या तीन महिन्यात जिल्हा परिषद, बारा पंचायत समित्या, कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका आणि दहाहून अधिक नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक आहे. त्यामुळे या सर्व निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावण्यासाठी शिंदेसेनेने कंबर कसली असल्याचे दिसून येते.