शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच का?; नगरपालिका क्षेत्रातील 'आशा' प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 12:21 IST

दरम्यान, तालुक्यातील आशांच्या कामांची माहिती संकलित करून ती तालुक्यात देण्याची जबाबदारी गटप्रवर्तकांची असते. त्यामुळे त्यांचेही नियोजन,रिर्पोटिंग महत्वाचे ठरते.मात्र,प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच होत असते. तर आता प्रोत्साहन अनुदानातूनही त्यांना वगळले आहे.

ठळक मुद्देत्यांच्या कामाचे महत्व प्रशासनाच्याही लक्षात आले आहे.मात्र त्यांच्या मानधन वाढीकडे दुर्लक्षच केले जात आहे.

नगरपालिका क्षेत्रातील 'आशा' प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

म्हाकवे -- : (कोल्हापूर)  शहर असो,खेडे अथवा डोंगरातील वाडयावस्त्या असोत याठिकाणी आशा स्वयंसेविका पोहचून माहिती घेत आहेत.कोरोनाविरोधात सुरू असणाऱ्या लढाईत सर्वात पुढच्या बाजूला आशांरुपी सैन्य कार्यरत आहे.त्यामुळे त्यांच्या योगदानाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी यांना एक हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र,कोल्हापूर शहरासह नगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या २००आशा व जिल्ह्यातील सर्वच १४०गटप्रवर्तक या लाभांपासून वंचित राहात आहेत. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यात २० मार्चपासून 'कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला साथ देत आशा वर्कर घरोघरी जाऊन सर्वेक्षणकरत आहेत. विदेश,इतर राज्य,अन्य जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेवून आरोग्य यंत्रणेला कळवणे, त्यांना होम क्वारंटाईन करणे, रोज घरी भेट देऊन त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती घेणे याची सर्वस्वी जबाबदारी आशांवर आहे.त्यांच्या कामाचे महत्व प्रशासनाच्याही लक्षात आले आहे.मात्र त्यांच्या मानधन वाढीकडे दुर्लक्षच केले जात आहे.

दरम्यान, तालुक्यातील आशांच्या कामांची माहिती संकलित करून ती तालुक्यात देण्याची जबाबदारी गटप्रवर्तकांची असते. त्यामुळे त्यांचेही नियोजन,रिर्पोटिंग महत्वाचे ठरते.मात्र,प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच होत असते. तर आता प्रोत्साहन अनुदानातूनही त्यांना वगळले आहे.तसेच,कोल्हापूर शहरासह  हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, हुपरी,  चंदगड,आजरा येथिल आशांनाही या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.मग महाराष्ट्राकडून 'निराशा' का?केरळ,तेलंगणा राज्यात आशांना ७ हजार ५०० रुपये मानधनमिळते.मात्र,महाराष्ट्रात राज्य शासन स्वतःकडीलकाहीच मानधन देत नाही. केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या २ हजार रुपये मानधनावरच बोळवण करत आहे.राज्य शासनाने २ हजार रुपये मानधनाची केलेली घोषणा अद्याप तरी हवेतच विरली असून माझा महाराष्ट्रच मागे का असा सवाल येथिल आशा करत आहेतएक दृष्टीक्षेप...

  • कोल्हापूर शहर व नगरपालिका क्षेत्रात आशांची संख्या १००
  • जिल्ह्यात एकूण-२७६५
  • जिल्ह्यात गटप्रवर्तक-१४०
  • राज्यात आशांची संख्या ७३ हजार
  • राज्यात गटप्रवर्तक-३५१०

 

"आशांचे योगदान महत्त्वाचे असतानाही त्यांच्या मानधनाकडे मात्र दुर्लक्ष असते.ग्रामीण इतकेच शहरी भागात घरोघरी जावून सर्व्हे करावा लागतो. मात्र,शहरी आणि नगरपालिका क्षेत्रातील आशांना प्रोत्साहन अनुदानातून वगळले आहे. शेवटी दोन्ही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आशा शासनाचेच काम करतात मग वेगळा नियम कशासाठी?याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे.नेत्रदीपा पाटील,जिल्हाध्यक्षा,आशा संघटना

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसाGovernmentसरकार