शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘वंचित’चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:03 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारने संमत केलेले नागरिकत्व सुधारणा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हे दोन्ही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शुक्रवारी ...

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘वंचित’चा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : मोदी-शहांचा निषेध

कोल्हापूर : केंद्र सरकारने संमत केलेले नागरिकत्व सुधारणा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हे दोन्ही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीनेजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी पुकारलेल्या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.दुपारी बाराच्या सुमारास बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)हे दोन्ही कायदे रद्द करावेत...,पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुर्दाबाद..., संविधान वाचवा..,अशा घोषणा देत आंदोलकांचा हा मोर्चा लक्ष्मीपुुरी, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यानंतर शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.निवेदनातील म्हंटले आहे की, देशातील जनतेमध्ये धर्माच्या आधारावर फूट पडणाऱ्या व संविधानविरोधी, संविधानाने मुलभूत अधिकारांची पायमल्ली करणाºया नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध आहे. देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात सरकारला जाब विचारणे, ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘एनपीआर’ या ओबीसी, एससी, एसटी, भटक्या विमुक्त, अलुतेदार-बलुतेदार यांच्यासह ४० टक्के हिंदूंना धोकादायक असलेल्या कायद्याला विरोधासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.आंदोलनात डॉ. अनिल माने, विलास कांबळे, अनिल म्हमाणे, मच्छिंद्र कांबळे, दयानंद ठाणेकर, तात्यासाहेब कांबळे, भूपाल शेवाळे, सचिन आडसुळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीkolhapurकोल्हापूरMorchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारी