शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शन मिळत नसल्याच्या नैराश्येतून प्रकार -शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:44 IST

नाटोली (ता. शिराळा) येथील सुखदेव आनंदा पाटील (वय ५४) या शेतकºयाने, वीज वितरण कंपनीकडे अनेक महिने हेलपाटे घालूनही शेती वीज पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नाही, या कारणावरून विषारी द्रव्य प्राशन करुन

ठळक मुद्देकोल्हापुरात उपचार सुरू१०८ रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

शिराळा : नाटोली (ता. शिराळा) येथील सुखदेव आनंदा पाटील (वय ५४) या शेतकºयाने, वीज वितरण कंपनीकडे अनेक महिने हेलपाटे घालूनही शेती वीज पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नाही, या कारणावरून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवार, दि. १६ रोजी सकाळी सात वाजता घडली.

सुखदेव पाटील हे आपली आई, पत्नी, दोन मुली, लहान मुलगा, भाऊ, भावजय अशा परिवारासह नाटोली येथे राहतात. एकत्रित कुटुंबाची ८ एकर शेतजमीन आहे. शेतामध्ये त्यांनी दोन वर्षांपूर्वी पाईपलाईन केली असून, वीज वितरण कंपनीकडे शेती पंपासाठी थ्री फेज कनेक्शनसाठी मागणी केली होती.वीज कनेक्शन मिळावे, यासाठी ते शिराळा, इस्लामपूर येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे वारंवार हेलपाटे घालत होते; मात्र अधिकारी वर्गाकडून काहीही कारणे सांगून बोळवण करण्याचा प्रयत्न केला जात होता. याचबरोबर शेतात पाणी नसल्याने उसाचे पीक वाळून गेले. वीज कनेक्शन नसल्यामुळे हातचे उसाचे पीक पाण्याविना वाळल्यामुळे होणारा आर्थिक फटका ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही.

त्यामुळे गुरुवारी सकाळी सुखदेव व त्यांची पत्नी शेतात गेले होते. त्यावेळी शेतातील वस्तीवरील शेडमध्ये त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. जवळच असणाºया त्यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने, त्यांच्या शेडच्या काही अंतरावर असणाºया वस्तीतील नागरिकांनी त्वरित धाव घेतली व सुखदेव यांना शिराळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.शेतकरी संतप्तशिराळा तालुक्यात वीज कनेक्शन मिळत नाही म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीबाबत संतापाची लाट शेतकरी व नागरिकांत पसरली आहे. महावितरणने शेतकऱ्यांना त्वरित वीज कनेक्शन दिले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा शेतकरी संघटनांनी इशारा दिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीDeathमृत्यू