सोनगेत भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:56+5:302021-02-05T07:04:56+5:30

गेल्या तीन दिवसापासून वास्तुशांती होमहवन तसेच विविध धार्मिक विधी व कार्यक्रम पार पडले. त्यामुळे गावात भाव-भक्तीला उधाण आले होते. ...

Depression of devotees in Songet | सोनगेत भाविकांची मांदियाळी

सोनगेत भाविकांची मांदियाळी

गेल्या तीन दिवसापासून वास्तुशांती होमहवन तसेच विविध धार्मिक विधी व कार्यक्रम पार पडले. त्यामुळे गावात भाव-भक्तीला उधाण आले होते.

दरम्यान, मंदिरावर केलेली विद्युतरोषणाई, गाभाऱ्याची फुलांच्या माळांनी केलेली सजावट, भव्य मंडप, भाविकांची गर्दी यामुळे वेदगंगा नदीकाठ चैतन्यमय झाला होता. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान कमिटी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते व गावकरी दिवसभर रखरखत्या उन्हातही परिश्रम घेत होते.

महिलांची उपस्थिती उल्लेखनीय..

चौंडेश्वरी देवीबाबत महिलावर्गात अत्यंत आत्मीयता आहे. त्यामुळे गावातील २०पासून नव्वदी गाठलेल्या माहेरवाशिणीही आजच्या वास्तुशांती सोहळ्याला हजेरी लावली होती. धार्मिक कार्यक्रमामुळे सोनगे परिसर भक्तिमय झाला होता.

मान्यवरांनी केले गावकऱ्याचे कौतुक...

वर्षभरातच कोणत्याही शासकीय निधीची अपेक्षा न करता गावकऱ्यांनी श्रमदान व लोकवर्गणीतून भव्यदिव्य मंदिराची उभारणी केली. भक्ती भाव, निष्ठा, दातृत्व आणि एकसंधपणामुळेच हे शक्य झाले आहे, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.

२७ सोनगे

कॅप्शन सोनगे येथील चौंडेश्वरी देवीच्या मंदिराचा कलशारोहण अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांच्या हस्ते झाले.

Web Title: Depression of devotees in Songet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.