शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

२९०० कोटींच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा

By admin | Updated: January 7, 2017 01:04 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र : ९०५ कोटींचे नवीन चलन

कोल्हापूर : रद्द झालेल्या जुन्या ५०० व १०००च्या नोटांच्या माध्यमातून सुमारे २९०० कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकांद्वारे चार करेन्सी चेस्टकडे जमा झाले आहेत. तसेच सुमारे ९०५ कोटी रुपयांचे नवीन चलन वितरीत झाले आहे. ‘नोटा रद्द’नंतरच्या ५० दिवसांतील हे चित्र आहे. जिल्ह्यात विविध राष्ट्रीयीकृत आणि खासगी ३२ बँकांच्या ३७३ शाखा कार्यरत आहेत. जुन्या ५०० व १०००च्या ‘नोटा रद्द’चा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर या नोटा ५० दिवसांपर्यंत बँकांमध्ये जमा करून घेण्यात आल्या. यासाठी स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र आणि रत्नाकर बँक लिमिटेड या चार करेन्सी चेस्ट कार्यरत होत्या. या ५० दिवसांच्या कालावधीत संबंधित जुन्या नोटांच्या माध्यमातून या चार करेन्सी चेस्टद्वारे सुमारे २९०० कोटी रुपये जमा झाल्या आहेत. तसेच विविध बँकांसाठी एकत्रितपणे सुमारे ११०० कोटी रुपये मिळाले. शिवाय सुमारे ९०५ कोटी रुपयांचे नवीन चलन वितरीत करण्यात आले. यामध्ये नव्या २०००, ५०० आणि १०० रुपयांच्या पटीतील नोटांचा समावेश होता. याबाबतचा अहवाल लवकरच रिझर्व्ह बँकेला सादर केला जाणार आहे. जमा झालेल्या जुन्या नोटांमध्ये जिल्हा बँक आणि नागरी बँकांमधील पैशांचा समावेश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी १०० कोटी रुपयांचे नवीन चलन प्राप्त झाले आहे.‘कॅशलेस’साठी ३१ गावांची निवडकेंद्र सरकारच्या आवाहनानुसार कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन आणि प्रबोधन करण्यासाठी बँकांकडून कार्यवाही सुरू झाली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांनी गावांची निवड केली आहे. त्यामध्ये दिंडनेर्ली, जैनापूर, दिगवडे, नागांव, हणबरवाडी, वाशी, तिळवणी, जैताळ, बारडगाव, नारेवाडी, दऱ्याचे वडगाव, शिये, चंदूर, शेळकेवाडी, नंदवाळ, उजळाईवाडी, नेबापूर, माळ्याची शिरोली, कागल, उचगाव, कोदे बुद्रुक, चिपरी, कुडित्रे, काडवे, गंगापूर, पेरिड, राजगोळी खुर्द, येळवण जुगाई, कसबा तारळे, सोनवडे, बुबनाळ या गावांचा समावेश आहे.