शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

अंगणवाडी सेविकांचे थकीत मानधन खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 18:07 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एप्रिल व मे या दोन महिन्यांतील थकलेले मानधन अखेर मंगळवारी खात्यावर जमा झाले आणि सेविका मदतनिसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जिल्ह्यातील आठ हजार ७३८ कर्मचाऱ्यांना १० कोटी ६६ लाख तीन हजार ६०० रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. हे मानधन थकीत राहिल्याबद्दल लोकमतने वृत्त दिले होते.

ठळक मुद्देअंगणवाडी सेविकांचे थकीत मानधन खात्यावर जमा, १० कोटी ६६ लाखांची रक्कमजिल्ह्यातील ८७३८ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा

कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एप्रिल व मे या दोन महिन्यांतील थकलेले मानधन अखेर मंगळवारी खात्यावर जमा झाले आणि सेविका मदतनिसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जिल्ह्यातील आठ हजार ७३८ कर्मचाऱ्यांना १० कोटी ६६ लाख तीन हजार ६०० रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. हे मानधन थकीत राहिल्याबद्दल लोकमतने वृत्त दिले होते.अंगणवाड्या बंद असतानाही कोरोना साथीच्या काळात रस्त्यावर उतरून प्रशासनाला हातभार लावणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल व मे महिन्यांतील मानधनच मिळालेले नव्हते. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक चणचण असतानाही मानधन मिळत नसल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाद्वारे प्रशासनावर रोष व्यक्त केला होता.

वित्त विभाग आणि कोषागार कार्यालयातील दिरंगाईमुळे प्रत्यक्षात बिले निघण्यास उशीर होत होता. अखेर मंत्रालय पातळीवर सूत्रे हलल्यानंतर मानधनाची देयके काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी प्रत्यक्ष खात्यावर मानधनाची रक्कम जमा झाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या अडचणीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.मिळणारे मानधन

  • सेविका ८०००
  • मदतनीस ४२००
  • जिल्ह्यातील अंगणवाड्या ४ हजार ३६९
  • मिळालेली थकीत मानधनाची रक्कम
  • सेविका ६ कोटी ९९ लाख ४ हजार
  • मदतनीस ३ कोटी ६६ लाख ९९ हजार ६००

कायमच प्रतीक्षागेले वर्षभर या ना त्या कारणाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनासाठी ताटकळत राहावे लागले आहे. किमान दोन ते तीन महिने थकवल्यानंतरच मानधन मिळत आहे. नोव्हेंबर ते जानेवारीचे मानधन फेब्रुवारीत, फेब्रुवारीचे एप्रिल तर एप्रिल व मे महिन्यांचे मानधन आता जून संपत आला असताना मिळाले आहे. कामाचा व्याप वाढवत असताना मानधनाच्या बाबतीत मात्र कायमच अन्याय केला जात असल्याची भावना अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर