शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यात ९ ऑगस्टपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा करा, अन्यथा..

By राजाराम लोंढे | Updated: July 13, 2022 17:36 IST

अनुदान तातडीने दिले नाहीतर ही फौज घेऊन मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही.

राजाराम लोंढेकोल्हापूर : नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ ऑगस्टपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा करा अन्यथा क्रांतीदिनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोको करू, असा इशारा ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या सरकारला दिला.प्रोत्साहनपर अनुदान तातडीने द्या, मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता द्या, एफआरपीच्या तुकड्याचा घेतलेला निर्णय रद्द करा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आज, बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता, मात्र या पावसातही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी दसरा चौकात जमा झाले होते. ‘कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा... विजय असो’ अशा घोषणा देत भरपावसात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. शिष्टमंडळाच्यावतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्याने साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे भारतातील साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. इथेनॉल निर्मितीही फायदेशीर ठरत असल्याने कारखानदारांना चांगले पैसे मिळत आहेत. त्यामुळे आमचा दुसरा हप्ता तातडीने द्या. आघाडी सरकारने एफआरपीच्या तुकड्याचा घेतलेला निर्णय रद्द करा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या...मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, भरपावसात ‘स्वाभिमानी’ची ही फौज गोळा झाली आहे, अनुदान तातडीने दिले नाहीतर ही फौज घेऊन मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही. अनिल मादनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, अजित पोवार, सागर संभूशेट्टे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी