ठेववृद्धी हीच सभासदांसह ठेवीदारांनी संस्थेस दिलेले प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:16+5:302021-02-23T04:36:16+5:30

कुंभोज : ठेवीदारांचा संस्थेवर विश्वास निर्माण झाल्याने कोरोना ...

Deposit increase is the certificate issued to the organization by the depositors along with the members | ठेववृद्धी हीच सभासदांसह ठेवीदारांनी संस्थेस दिलेले प्रमाणपत्र

ठेववृद्धी हीच सभासदांसह ठेवीदारांनी संस्थेस दिलेले प्रमाणपत्र

कुंभोज : ठेवीदारांचा संस्थेवर विश्वास निर्माण झाल्याने कोरोना काळातही संस्थेकडे झालेली ठेववृद्धी हेच सभासदांसह ठेवीदारांनी संस्थेस चांगल्या कामकाजाचे दिलेले प्रमाणपत्र आहे. सभासदांचा हा विश्वास संचालक मंडळ कायम सार्थ ठरवेल, असा विश्वास सावर्डे (ता. हातकणंगले) येथील आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक बजरंग लुगडे यांनी व्यक्त केला. पतसंस्थेच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

बजरंग लुगडे यांनी दोन्ही संस्थांचे ताळेबंद पत्रक तसेच अहवालाचे वाचन केले. पतसंस्थेच्या सभेनंतर आदर्श सहकारी दूध संस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. सर्व विषयांस सभासदांनी मंजुरी दिली. यावेळी पतसंस्थेचे संचालक शिवाजी यांनी मनोगत व्यक्त केले.

सभेस पतसंस्थेच्या अध्यक्षा आनंदी लुगडे, दूध संस्थेच्या अध्यक्षा सविता खाडे, उपाध्यक्षा वत्सला लुगडे, पतसंस्था तसेच दूध संस्थेचे सर्व संचालक तसेच कर्मचारी उपस्थित होते. जयश्री खाडे यांनी आभार मानले.

फोटो ओळी- सावर्डे, ता. हातकणंगले येथील आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्था तसेच महिला दूध संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थापक बजरंग लुगडे तसेच दोन्ही संस्थांचे संचालक मंडळ.

Web Title: Deposit increase is the certificate issued to the organization by the depositors along with the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.