शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कोल्हापूर शहरात डेंग्यूचा फैलाव,२० रुग्ण आढळले : महापालिका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:51 AM

कोल्हापूर : शहर परिसरात गेल्या आठ दिवसांत डेंग्यूचे २० रुग्ण आढळल्यामुळे महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

कोल्हापूर : शहर परिसरात गेल्या आठ दिवसांत डेंग्यूचे २० रुग्ण आढळल्यामुळे महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यासंदर्भात पंचगंगा रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय अधिकाºयांच्या बैठकीत पुढील काळात करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले. तातडीने घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्याधिकारी डॉ. अजित वाडेकर होते.

गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येऊ लागल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर आरोग्याधिकारी डॉ. वाडेकर यांनी तातडीने मंगळवारी पंचगंगा रुग्णालयात महापालिकेच्या सर्व वैद्यकीय अधिकाºयांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे, नोडल आॅफिसर डॉ. अमोलकुमार माने यांच्यासह सर्व अकरा केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.बैठकीत डेंग्यू आजारांच्या रुग्णाबाबतचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी शहरातील जुना बुधवार पेठ, सीपीआर हॉस्पिटल हॉस्टेल, मंगेशकरनगर, कनाननगर, जवाहरनगर येथून काही रुग्णांनी सीपीआर हॉस्पिटल तसेच खासगी रुग्णालयांत उपचार घेतले आहेत. त्यापैकी गेल्या आठ दिवसांत तब्बल २० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती समोर आली.डेंग्यूचे डास कसे तयार होतात?डेंग्यूचे डास प्रामुख्याने स्वच्छ पाण्यात अळ्या घालतात.गच्चीवर, परिसरात साचलेल्या पाण्यात अळ्या घालतातडासांपासून रोगजंतूंचा प्रसार होतो.डेंग्यूचे डास हे दिवसा चावा घेतात.डेंग्यूची लक्षणेसुरुवातीला जोराचा ताप येतो.अचानक थंडी वाजायला लागते.तीव्र स्वरूपाची अंगदुखी सुरू होते.डोळ्याच्या मागील बाजूची डोकेदुखी.अंगावर लालसर पुरळ उठतात.रक्तातील प्लेटलेट कमी होतात.डेंग्यूचे २० रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य उपचार व खबरदारीने आपण त्यावर मात करू शकतो. नागरिकांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे खबरदारी घ्यावी व महापालिकेस सहकार्य करावे.- डॉ. अरुण वाडेकर, आरोग्याधिकारी मनपा.