शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया सर्वेक्षण, १६ ठिकाणी अळ्या सापडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST2021-02-05T07:16:32+5:302021-02-05T07:16:32+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य, कीटकनाशक विभागामार्फत बुधवारी शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणाकरिता डास-अळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. एकूण २१६८ ...

शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया सर्वेक्षण, १६ ठिकाणी अळ्या सापडल्या
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य, कीटकनाशक विभागामार्फत बुधवारी शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणाकरिता डास-अळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. एकूण २१६८ घरे तपासण्यात आली. या घरांमध्ये वापरासाठी साठविण्यात येणारे ३७५६ कंटेनर तपासले. यामध्ये १६ ठिकाणी डासअळ्या आढळल्या.
महापालिकेच्या वतीने खासगी एजन्सीमार्फत २५ बिडिंग चेकर्स नेमण्यात आले आहेत. आरोग्य निरीक्षक, मुकादम, डासअळी सर्वेक्षण कर्मचारी यांच्यासोबत या बिडिंग चेकर्सनी नागाळा पार्क, सरगम विहार कॉलनी, केव्हीज पार्क, चौरंगी अपार्टमेंट, महावीर कॉलेज, नाईक मळा, पुंगावकर मळा, म्हाडा कॉलनी, डायमंड हॉस्पिटल, आतील सर्व परिसर, पोवार मळा, वागळे मळा, यशवंत प्लाझा, सनसिटी सोसायटी, दत्तमंदिर, माळी मळा, मणेर माळ चौक, गणपती गल्ली, प्रभू हॉस्पिटल, खानविलकर पंप, इत्यादी ठिकाणी डासअळीचे सर्व्हेक्षण करण्यात आले.