शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

माध्यमिक शिक्षक संघाची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:10 IST

माध्यमिक शिक्षण विभागातील दप्तर दिरंगाई, मनमानी आणि गलथान कारभाराचे अनेक शिक्षक बळी ठरत असल्याचा आरोप जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आला आहे. शिक्षकांवरील अन्यायाविरोधात संघटनेच्या माध्यमातून पिढीत शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने केली.

ठळक मुद्देमाध्यमिक शिक्षक संघाची जिल्हा परिषदेसमोर निदर्शनेशिक्षकांवरील अन्यायाविरोधात संघटनेच्या माध्यमातून विरोध

कोल्हापूर : माध्यमिक शिक्षण विभागातील दप्तर दिरंगाई, मनमानी आणि गलथान कारभाराचे अनेक शिक्षक बळी ठरत असल्याचा आरोप जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आला आहे. शिक्षकांवरील अन्यायाविरोधात संघटनेच्या माध्यमातून पिढीत शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने केली.पिढीत शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिर्घ काळापासून होत असणाऱ्या अन्यायाबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना वेळोवेळी निवेदने दिल्यानंतर आदेश होऊन न्याय मिळालेला नाही.

कणेरीमठ येथील काडसिद्धेश्वर शाळेतील पटसंख्या घटल्याचे कारण पुढे करत तिल्लोत्तमा सोनवणे यांना अतिरिक्त शिक्षक ठरवले. टोप येथील शाळेत समायोजन करण्याचे आदेश बदलत कांडगाव हायस्कूल येथे समायोजन केल्याचे नवे आदेश काढले.

जे आदेश त्यांना अद्यपाही मिळालेले नाहीत. अशा विविध कारणांनी १३ शिक्षक पिढीत आहेत. यांच्याबाबत न्यायालयाकडून सुस्पष्ट आदेश होऊनही त्याची अंमलबजावणी झालेल्या नाही. त्यांना थातूरमातुर कारणे सांगण्याबरोबरच उद्धट वागणुक दिली जात आहे.

यामधील बहुसंख्य तक्रारी या शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याशी निगडीत आहेत. ते हेतुपुरस्सर कर्तव्यात कसूर करत आहेत. वरीष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालून पिढीत शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. यावेळी शिक्षक संघटनेचे बी.एस. खामकर, सुरेश खोत, रविंद्र देसाई, शिवलता फुटाणे आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर