शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईनवरच जिल्ह्यात योगाची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:34 IST

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी ऑनलाईनच घरात योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतीकात्मक, घरगुती व ऑनलाईन पद्धतीनेच यंदा योग दिन साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देऑनलाईनवरच जिल्ह्यात योगाची प्रात्यक्षिकेजिल्हा क्रीडा विभाग, पतंजली योग समिती, सुकृत फौंडेशनतर्फे आयोजन

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी ऑनलाईनच घरात योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतीकात्मक, घरगुती व ऑनलाईन पद्धतीनेच यंदा योग दिन साजरा करण्यात आला.जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडासंकुलात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी सातपासून आमदार चंद्रकांत जाधव, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.इचलकरंजी येथील योग प्रशिक्षक सुहास पोवळे यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले. यानंतर योगपटू सेजल सुतार, गार्गी भट व ईश्वर वरदायी यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ क्रीडाशिक्षक युवराज मोळे व नाना पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार झाला.

यानंतर क्रीडा शिक्षकांसाठी खेळामध्ये मानसशास्त्राची भूमिका (रोल ऑफ सायकॉलॉजी इन स्पोर्टस ) या विषयावर डॉ. भूषण चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन झाले. यात त्यांनी गेम ॲग्रेशन, ॲटिट्यूड, एकाग्रता, खेळाडूंना असणारे ताण-तणाव, चिंता, रक्तदाब यांसह शारीरिक व मानसिक व्याधी यांवर मार्गदर्शन केले.पतंजली योग समितीतर्फे ह्यऑनलाईनह्ण देशव्यापी योग दिन साजरा करण्यात आला. आयुष मंत्रालयातर्फे हरिद्वार येथे मुख्य कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सकाळी ७ ते ८ या वेळेत देशभर झाले. कोल्हापूर शहरात सकाळी ९ ते १०, इचलकरंजी येथे सकाळी ६ ते ७, गारगोटी ७ ते ८ , देवकर पाणंद, यशवंत लॉन येथे ७ ते ८ यासह जिल्ह्यात १७ ठिकाणी ऑनलाईन योग करण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर खापणे यांनी दिली.शाहूपुरी परिसरातील सुकृत फौंडेशनच्या वतीने २१ जून या योग दिवसानिमित्त फौडेशनतर्फे घरोघरी योगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. फौडेशनचे सर्व सदस्यांनी आपल्या घरीच परिवारासह योगा केल्याची माहिती सुकृत फौंडेशनचे प्रमुख सुरेश शहा यांनी दिली. 

टॅग्स :Yogaयोगkolhapurकोल्हापूर