आरोग्यसेविकांच्या रद्द पदांबाबत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:03+5:302021-09-09T04:31:03+5:30
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असणाऱ्या आरोग्यसेविकांची कंत्राटी पदे रद्द केल्याच्या निषेधार्थ ...

आरोग्यसेविकांच्या रद्द पदांबाबत निदर्शने
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असणाऱ्या आरोग्यसेविकांची कंत्राटी पदे रद्द केल्याच्या निषेधार्थ कंत्राटी कर्मचारी, आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली.
गेली १४ वर्षे कार्यरत असणाऱ्या अनेक आरोग्यसेविकांना एका आदेशासरशी कामावरून कमी केल्याने यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. शून्य प्रसूतीचा लावलेला निकष चुकीचा आहे. कोविडकाळात कोविडची कामे लावण्यात आली असताना आता प्रसूतीचा निकष कसा लावता, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. नवीन लोकसंख्येचा विचार न करता याबाबत निकष शासनाने लावला असून तोदेखील अन्याय करणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या आदेशाला तत्काळ स्थगिती देऊन या सर्व आरोग्यसेविकांचे इतर कंत्राटी पदांवर समायोजन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्य समन्वयक स्वप्निल गोसावी, योगिनी गुरव, मेहबूब् शेख, प्रवीण मुळीक यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०८०९२०२१ कोल झेडपी ०१
कंत्राटी आरोग्यसेविकांची पदे रद्द केल्याच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली.
(छाया : नसीर अत्तार)