आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST2021-06-28T04:18:06+5:302021-06-28T04:18:06+5:30

कोल्हापूर : येथील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थेमार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम रविवारी पंचगंगा घाट, शिवाजी पूल येथे पार ...

Demonstration of Disaster Management | आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके सादर

आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके सादर

कोल्हापूर : येथील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थेमार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम रविवारी पंचगंगा घाट, शिवाजी पूल येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले, विजय गुळवे, संभाजी साळुंखे, शरद माळी, विराट करी, महेश खाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह बोट क्लबचे राष्ट्रीय खेळाडू, भूलशास्त्रतज्ज्ञ संघटना कोल्हापूरचे डॉक्टर्स, कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी पंचगंगा घाटावर गर्दी झाली होती.

फोटो क्रमांक - २७०६२०२१-कोल-आपत्ती व्यवस्थापन०१ व ०२

ओळ - कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर येथील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थेमार्फत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

Web Title: Demonstration of Disaster Management