शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेची ऊस तोडणी दरवाढीसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:34 IST

राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी कोल्हापुरात प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेलाच; तसेच काही काळ लक्ष्मीपुरी मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली.

ठळक मुद्देवाहतूक दरातही वाढ करण्याची मागणी कोल्हापुरात साखर सहसंचालकांना निवेदनसरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी काही काळ लक्ष्मीपुरी मार्गावरील वाहतूकही विस्कळीत

कोल्हापूर ,दि. २५ :  राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेलाच; तसेच काही काळ लक्ष्मीपुरी मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली.

संघटनेचे प्रा. डॉ. सुभाष जाधव व प्रा.आबासाहेब चौगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांच्याशी चर्चा केली. यामध्ये प्रा. जाधव व चौगले यांनी आक्रमकपणे बाजू मांडली. ऊस तोडणी व वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत सप्टेंबर २०१७ पासून राज्यात आंदोलन सुरू आहे.

उसाचा हंगाम तोंडावर असल्याने तत्पूर्वी तोडणी व वहातूक दरवाढीचा निर्णय व्हावा, यासाठी संघटना प्रयत्नशील होती. दरवाढीचा करार होणे अपेक्षित होते; पण राज्य सरकार व राज्य साखर संघ वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याने आंदोलन आक्रमक करावे लागत असल्याचे प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले. यावेळी दिनकर आदमापुरे, बाबासो कुरुंदवाडे, विलास दिंडे, भिवाजी शिंदे, राजाराम गौड, राजाराम परीट, लहू दिवसे, विलास केनवडे, आदी मान्यवर उपस्थित होते.या आहेत मागण्या :

  1. ऊस तोडणीचा दर प्रतिटन ३७८ रुपये करा.
  2. ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्केवाढ करा.
  3. मुकादमांच्या कमिशनचा दर २० टक्के करा.
  4. माथाडी बोर्डात ऊस तोडणी मजुरांचा समावेश करा.
  5. तीन लाखांच्या अपघात विम्याची कारखान्यांनी अंमलबजावणी करावी.
  6. बैलजोडीचा ७५ हजारांचा अपघात विमा लागू करा.
  7. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना साडेतीन हजार दर द्या.

 

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर