पांजरपोळ परिसरात दुरुस्तीच्या चारचाकींची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST2021-08-01T04:23:44+5:302021-08-01T04:23:44+5:30

कोल्हापूर : पांजरपोळ परिसरात अज्ञातांनी अंधाराचा फायदा घेत दुरुस्तीसाठी आलेल्या चारचाकींची तोडफोड केली. महिनाभरातील हा दुसरा प्रकार घडल्यामुळे गॅरेज ...

Demolition of repair four-wheelers in Panjarpol area | पांजरपोळ परिसरात दुरुस्तीच्या चारचाकींची तोडफोड

पांजरपोळ परिसरात दुरुस्तीच्या चारचाकींची तोडफोड

कोल्हापूर : पांजरपोळ परिसरात अज्ञातांनी अंधाराचा फायदा घेत दुरुस्तीसाठी आलेल्या चारचाकींची तोडफोड केली. महिनाभरातील हा दुसरा प्रकार घडल्यामुळे गॅरेज चालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही तोडफोड करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पांजरपोळ परिसरात चारचाकी दुरुस्तीची अनेक मोटार गॅरेज आहेत. येथील एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी तीन चारचाकी आल्या होत्या. गॅरेज बंद झाल्यानंतर रात्री अंधाराचा फायदा घेत मद्यपींनी तिन्ही अलिशान चारचाकींवर दगड फेकून मारले. त्यात एका चारचाकीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा असाच प्रकार घडला. परिसरात उभ्या केलेल्या अलिशान मोटारीच्या काचेवर मोठा दगड फेकून मारण्यात आला. त्यामुळे या चारचाकीचे मोठे नुकसान झाले. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिसात झालेली नाही.

रात्री गस्त आवश्यक

या परिसरात मोठ्या प्रमाणात चारचाकी दुरुस्तीची गॅरेज आहेत. त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी किमती चारचाकी येत असतात. कामानिमित्त त्या दारात उभ्या केल्या जातात. रात्री गॅरेज बंद केल्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात मद्यपी व नशेबाजांचा वावर असतो. मद्यपान केल्यानंतर त्यांच्यात आपसातच भांडणे होतात. त्यातून उभ्या असलेल्या चारचाकींवर दगडफेक करुन त्यांचे नुकसान केले जाते. येथे काही दुर्दैवी घटना घडू नये, याकरिता पोलिसांनी या परिसरात रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी गॅरेज चालकांकडून होत आहे.

फोटो : ३१०७२०२१-कोल-पांजरपोळ

ओळी : पांजरपोळ परिसरात दुरुस्तीसाठी उभ्या केलेल्या चारचाकीवर अज्ञाताने दगड फेकून मारला. त्यामुळे मोठे नुकसान झाले.

Web Title: Demolition of repair four-wheelers in Panjarpol area