शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सरनोबतवाडीत येथील पुलाचे पाडकाम सुरु, अवजड वाहने जाऊ शकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:27 IST

मोहन सातपुते  उचगाव: पुणे -बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील शिवाजी विद्यापीठ- राजाराम तलाव शेजारील भूमिगत पूल पाडण्याचे ...

मोहन सातपुते उचगाव: पुणे -बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील शिवाजी विद्यापीठ- राजाराम तलाव शेजारील भूमिगत पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी हा पूल सहा बाय साडेतीन मीटरचा  होता. यामुळे अवजड वाहने, कंटेनर या पुलाखाली अडकून पडत होते. आता या ठिकाणी वीस बाय साडे पाच मीटरचा दोन गाळ्याचा अंडर पूल होणार आहे. अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, उजळाईवाडी येथील अधिकाऱ्यांनी दिली.नुकतेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत रोड वें सोल्यूशन यांच्या वतीने उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, लक्ष्मी टेकडी पर्यंतच्या उड्डाण पूल व भूमिगत पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. 

येथे होणार पूलगांधीनगर, तावडे हॉटेल, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, केआयटी कॉलेज रोड, गोकुळ शिरगाव, कणेरी मठ, कणेरी वाडी, महालक्ष्मी टेकडी पर्यंतचे भूमिगत, उड्डाण पूल होणार आहेत.

सरनोबतवाडी गाव विस्तारत आहे. येथील हा पुल अवजड वाहनाकरिता कुचकामी होता. आता नव्याने दोन गाळ्याचा पूल होणार असल्याने समस्या दूर झाली आहे - दीपक आडसुळ, ग्रामस्थ, सरनोबतवाडी  

महामार्गाचे सहापदरीकरण सुरू आहे. सर्व्हिस रस्ते साडे सात मिटरचे दोन्ही बाजूंना होणार आहेत. वाढती रहदारी लक्षात घेता ही कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सरनोबतवाडीकडे येणाऱ्या वाहन धारकानी उचगाव पुलाकडे वळावे व उचगावकडून सरनोबतवाडीकडे येणाऱ्या वाहनधारकांनी उजळाईवाडी पुलाकडून यावे - चद्रकांत बरडे, वरिष्ठ अधिकारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,उजळाईवाडी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग