शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या संचालिकेकडून हॉस्पिटलची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 11:44 IST

crimenews, police, hospital, kolhapurnews दारात पार्किंग केलेली चारचाकी गाडी काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून युवकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी दुपारी शनिवार पेठ पोस्टानजीक घडली.

ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या संचालिकेकडून हॉस्पिटलची तोडफोडदारात गाडी लावण्यावरून वाद : शनिवार पेठेतील प्रकार; १२ जणांवर गुन्हा

कोल्हापूर : दारात पार्किंग केलेली चारचाकी गाडी काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून युवकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी दुपारी शनिवार पेठ पोस्टानजीक घडली.

हल्ल्यात महिला डॉक्टर जयंता अभय पाटील, त्यांचा मुलगा विश्वजित (रा. २०२१, सी वॉर्ड, शनिवार पेठ) हे जखमी झाले. डॉक्टरांच्या तक्रारीनुसार जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे यांच्यासह १० ते १२ अज्ञातांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार पेठ पोस्टानजीक डॉ. जयंता पाटील यांचे माउली हॉस्पिटल आहे. मंगळवारी दुपारी उदयानी साळुंखे आपल्या गाडीतून शनिवार पेठ पोस्टानजीक कामानिमित्त गेल्या होत्या. चालकाने मोटार हॉस्पिटलच्या पार्किंगच्या आवारात थांबवली.

गाडी काढण्यावरून चालक व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा वाद झाला. गाडी मागे घेताना रुग्णालयाच्या दारातच बंद पडली. गाडीची सुरू राहिलेली रिव्हर्सची धून चालकाने वायर कापून बंद केली. या धूनच्या गोंगाटामुळे डॉ. पाटील यांना राग आला. त्यावेळी उदयानी साळुंखे तेथे आल्या. त्यांचाही डॉ. पाटील यांच्याशी वाद झाला. साळुंखे यांच्यासोबत आलेल्या १० ते १२ युवकांनी हॉस्पिटलवर हल्ला चढविला.युवकांनी कन्सल्टिंग रूममध्ये शिरून डॉ. पाटील यांचा हात पकडला. त्यावेळी साळुंखे यांनी डॉक्टरना मारहाण केली. कन्सल्टिंग रूममधील पितळी घोडाही त्यांच्या उजव्या हातावर मारून त्यांना जखमी केले.

डॉक्टरांचा मुलगा विश्वजित हा सोडविण्यासाठी आला असता त्यालाही शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने युवक पांगले. या प्रकरणी डॉ. जयंता पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून साळुंखेंसह अज्ञात १० ते १२ जणांवर गुन्हा नोंद झाला.साहित्याची मोडतोडयुवकांनी हल्ल्यात हॉस्पिटलमधील कन्सल्टिंग रूममधील साहित्याची नासधूस केली. त्यामध्ये संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे, पितळी कुंड्या, खुर्च्यांची मोडतोड केल्याचे तक्रारीत म्हटले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर