शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालाच्या दरात वाढ; मग हमाली चार वर्षांपुर्वीची कशी?, हमाली ३० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:52 IST

कोल्हापूर : शेतीमालाच्या दरात वाढ झाली आहे, त्यातच महागाई गगनाला भिडली असताना, मग हमाली चार वर्षांपूर्वीची कशी? असा सवाल ...

कोल्हापूर : शेतीमालाच्या दरात वाढ झाली आहे, त्यातच महागाई गगनाला भिडली असताना, मग हमाली चार वर्षांपूर्वीची कशी? असा सवाल करत किमान ३० टक्के वाढीवर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील हमाल ठाम आहेत, तर इतर समित्यांबरोबरच येथील हमाली असल्याचा दावा व्यापाऱ्यांचा असल्याने आता जिल्हा उपनिबंधकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत गूळ, भाजीपाला, कांदा-बटाट्यासह इतर विभागात हमाल कार्यरत आहेत. अडत दुकान व व्यापाऱ्यांकडे हमाल स्वतंत्र आहेत. बाजार समितीत गूळ विभागात साधारणत: पाचशे तर कांदा-बटाटा विभागात ३२५ हमाल कार्यरत आहेत. तीन वर्षांनी हमालीमध्ये वाढ करण्याचा नियम आहे; पण २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून बाजार समितीमध्ये हमालीमध्ये वाढ झालेली नाही. मध्यंतरी हमालांनी संप केल्यानंतर तो अधिकच ताणला होता. शेवट जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कामकाज सुरू झाले होते.आता, हमाल संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. वाढीसाठी त्यांनी बाजार समितीकडे रीतसर मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात यावर जिल्हा उपनिबंधकांकडे बैठक होऊन चर्चाही झाली आहे. चार वर्षांनंतर वाढ होत असल्याने किमान ३० टक्के वाढ द्यावी, अशी मागणी आहे; पण याबाबत संबंधित घटक तयार नाहीत.

महागाई निर्देशकांनुसारच द्याटक्केवारी देण्यापेक्षा महागाई निर्देशकांनुसारच हमालीत वाढ करावी, अशी मागणी हमाल संघटनेची आहे.

अशी आहे विभागनिहाय हमाली-गूळ विभाग ३० किलो रवा - ३.३० रुपये१० किलो रवा - १.४५ रुपये५ किलो रवा - ९५ पैसेकांदा-बटाटा विभाग-क्विंटलला - १०.४५ रुपये

हमाली वाढीचा प्रस्ताव समितीकडे दिला आहे. सकारात्मक चर्चा सुरू असून योग्य तो निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. - कृष्णात खोत (कांदा-बटाटा हमाल संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार