तेरणी येथे जिल्हा बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:09+5:302021-09-17T04:29:09+5:30
तेरणीसह कळविकट्टे बुगडीकट्टे या गावातील अनेक शेतकरी खातेदार यांची सोय होण्यासाठी तेरणी येथे जिल्हा बँकेच्या शाखा सुरू करण्यात यावी, ...

तेरणी येथे जिल्हा बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी
तेरणीसह कळविकट्टे बुगडीकट्टे या गावातील अनेक शेतकरी खातेदार यांची सोय होण्यासाठी तेरणी येथे जिल्हा बँकेच्या शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी तेरणी ग्रामपंचायतीने पत्रातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
जिल्हा बँकेसंबंधी कोणत्याही कामासाठी ४ ते ८ कि.मी.चा प्रवास करून हलकर्णीला ये-जा करावी लागते. त्यामुळे वेळेसह प्रवास खर्चही होतो. तेरणी-कवळीकट्टी, बुगडीकट्टी या गावांतील शेतकरी, कर्जदार, ऊस-उत्पादक खातेदार, ठेवीदार यांची संख्याही मोठी आहे. किसान सन्मान योजनेच्या वृद्ध खातेदारांना लॉकडाऊनमध्ये प्रवासाची सोय नसल्याने मोठा त्रास सोसावा लागला होता.
गावात बँकेची सोय व्हावी म्हणून काही ग्रामस्थांनी लेखी मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे. त्यामुळे नफा हा केंद्रबिंदू न ठेवता सेवा वृत्तीतून बँकेने येथे शाखा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांची मागणी आहे.
पत्रकावर, सरपंच मोसीम मुल्ला, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.