गिधाडांसाठी रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:46+5:302021-07-04T04:17:46+5:30
कोल्हापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे कोकणातील गिधाडांचा अधिवास धोक्यात आला आहे. केवळ कोकणातच उरलेल्या या दुर्मीळ गिधाडांसाठी ...

गिधाडांसाठी रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी
कोल्हापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे कोकणातील गिधाडांचा अधिवास धोक्यात आला आहे. केवळ कोकणातच उरलेल्या या दुर्मीळ गिधाडांसाठी रेस्क्यू सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण तसेच पक्षीप्रेमींकडून होत आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील गिधाडांच्या अधिवासाला बसला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून श्रीवर्धन वन विभाग कार्यालय परिसरात बचाव केलेल्या सहा गिधाडांना ठेवण्यात आले असून या आठवड्यात गिधाडांच्या दोन पिल्लांना वाचवण्यात आले आहे.
कोकणामध्ये गिधाडांची मोठी संख्या रायगड जिल्ह्यात दिसून येते. जिल्ह्यातील म्हासाळा आणि श्रीवर्धन तालुक्यात गिधाडांचा अधिवास आहे. याठिकाणी प्रामुख्याने पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांचा कायमस्वरूपी अधिवास आहे. शिवाय स्थलांतर करून येणाऱ्या हिमालयीन ग्रिफाॅन, युरेशियन ग्रिफाॅन आणि काळ्या गिधाडांची नोंद आहे.
गेल्यावर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील गिधाडांच्या अधिवासाला मोठा धक्का बसला होता. मात्र, चक्रीवादळानंतर गिधाडांची संख्या कमी झाली आहे. आताही झालेल्या आणि होणाऱ्या पावसामुळे येथील गिधाडांच्या घरट्यामधील पिल्लांना बेघर होण्याची वेळ आली आहे. श्रीवर्धनमध्ये घरट्याबाहेर पडलेली गिधाडांची पिल्ले आढळून येत आहेत.
गेल्या आठवड्यात श्रीवर्धन येथील वसंत यादव यांच्या खोतांच्या वाडीतील नारळाच्या बागेत एक गिधाडांचे पिल्लू पडलेले आढळले. गणेश कुडगावकर आणि सिस्केप संस्थेच्या पूजा पुजारी यांनी त्या पिल्लाला वाचवले. त्यानंतर मंगळवारी श्रीवर्धनमधीलच भट्टीचा माळ येथे गिधाडाचे पिल्लू पडल्याची माहिती श्रीवर्धन वनक्षेत्रपाल मिलिंद राऊत यांनी सिस्केप संस्थेच्या प्रेमसागर मेस्त्री यांना दिली. स्थानिक सिस्केप सदस्य गणेश यांनी त्वरित पिल्लाला रेस्क्यू केले. रेस्क्यू केलेली सर्व गिधाडे ही पांढऱ्या पाठीची भारतीय गिधाडं आहेत. त्यांना एका छोट्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले असून सिस्केप संस्थेच्या माध्यमातून त्यांचे पालनपोषण सुरू आहे.
कोट
गिधाडाच्या एका पिल्लास रोज एक वेळा ३०० ते ४०० ग्राम मांस खाण्यासाठी द्यावे लागते. या पक्षांच्या पंखाचा विस्तारही ६ ते ७ फूट असल्याने यांच्यासाठी किमान २० फूट वर्ग क्षेत्रफळाइतके मोठे पिंजरे आवश्यक आहेत. त्यामुळे श्रीवर्धन येथे एक सुसज्ज रेस्क्यू सेंटर उभारण्याची गरज आहे.
- प्रेमसागार मेस्त्री,
मानद वन्यजीव रक्षक,
अध्यक्ष, सिस्केप, अलिबाग (जि. रायगड)
---------------------------------------------------------------
फाेटो : 03072021-kol-konkan gidhad-sager mestri
फोटो ओळी : पावसापासून वाचविलेल्या गिधाडांच्या पिल्लांसह सिस्केप संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री.
---
फाेटो : 03072021-kol-konkan gidhad
फोटो ओळी : पावसापासून वाचविलेले पांढऱ्या पाठीचे गिधाड.
030721\03kol_2_03072021_5.jpg~030721\03kol_3_03072021_5.jpg
फाेटो : 03072021-kol-konkan gidhad-sager mestriफोटो ओळी : पावसापासून वाचविलेल्या गिधाडांच्या पिल्लांसह सिस्केप संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री.~फाेटो : 03072021-kol-konkan gidhadफोटो ओळी : पावसापासून वाचविलेले पांढऱ्या पाठीचे गिधाड.