शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: त्रास न देण्यासाठी २० लाखांची मागणी, माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी घेताना मध्यरात्री अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:36 IST

कोळी याला ३० हजार रूपयांची खंडणी रक्कम स्वीकारताना पकडले

कोल्हापूर : येथील माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज भिमराव कोळी (रा. हाॅकी स्टेडियम कोल्हापूर) आणि त्याचा सहकारी युवराज मारूती खराडे (रा. उचगाव ता. करवीर) या दोघांना कागलजवळील लक्ष्मी टेकडीजवळ खंडणीची रक्कम घेताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली. सीपीआरमधील वैद्यकीय उपकरणे पुरवठादार अजिंक्य पाटील यांच्याकडून तो ही रक्कम स्वीकारत होता.पाटील यांच्याविरोधात कोळी याने अनेक तक्रारी केल्या होत्या. यातून पाटील यांना अटकही झाली होती. यापुढच्या काळात त्रास न देण्यासाठी २० लाख रूपयांची मागणी कोळी याने केली होती. पाटील यांनी १५ लाख रूपये देण्याचे मान्य केले.

यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पाटील यांनी ही माहिती दिल्यानंतर या विभागाने त्यांच्याकडील ३० हजार रूपये पाटील यांना दिले आणि मध्यरात्री कागलजवळील राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी टेकडी येथे खंडणीची रक्कम घेण्यासाठी कोळी याला बोलावण्यात आले.त्यानुसार कोळी याला ३० हजार रूपयांची खंडणी रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. त्याच्यासह सहकाऱ्यावरही कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण रोख रकमेसह चारचाकी वाहन, मोबाईल असा ५ लाख ८० हजाराचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.