‘श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ’ नामकरण करण्याची मागणी
By Admin | Updated: January 13, 2015 00:13 IST2015-01-12T23:49:51+5:302015-01-13T00:13:14+5:30
शिरोलीतील ‘जय भवानी, जय शिवाजी’ संघटनेचा मोर्चा

‘श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ’ नामकरण करण्याची मागणी
कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठा’चे नाव बदलून ते ‘श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ’ असे करावे, या मागणीसाठी शिरोली पुलाची येथील ‘जय भवानी, जय शिवाजी’ संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात
आला. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.दुपारी साडेबाराच्या सुमारास शिरोेली येथील जय भवानी, जय शिवाजी संघटनेचे कार्यकर्ते मोटारसायकल रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या ठिकाणी काहीकाळ जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला. यानंतर जय भवानी, जय शिवाजी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत खवरे व छत्रपती प्रतिष्ठानचे संतोष कांदेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन सादर केले.शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून शिवाजी विद्यापीठाचा कारभार इंग्रजीमध्ये रऌकश्अखक वठकश्एफरकळया नावानेच चालू आहे. जवळपास ५० वर्षे होत आली तरी ही चूक कुठल्याही जाणकार व्यक्तीच्या किंवा इतिहासतज्ज्ञांच्या लक्षात आली नाही. येथील इतिहास विभागातून अनेकांनी डॉक्टरेट मिळविली आहे. त्या लोकांना देखील ही चूक कशी काय लक्षात आली नाही? याबाबत नवल वाटते. शिवाजी विद्यापीठ म्हणजे ‘शिवाजी’ या नावाने अनेकांनी जन्म घेतला. त्यांच्या नावाचे हे विद्यापीठ समजायचे का? असा सवाल करत हा विषय गांभीर्याने घेऊन या विद्यापीठाचे नाव ‘श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ’ करण्यासंदर्भात आपली मागणी शासनाला कळवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
मोर्चात जोतिराम पोर्लेकर, उत्तम पाटील, सरदार मुल्ला, शिवाजी उन्हाळे, अतुल सोडगे, अजिंक्य पाटील, मन्सूर नदाफ, राहुल अनुसे, रवी यादव, भगवान पाटील, नंदू माने, स्वरूप नवले, महंमद महात, संग्रमा खवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते (प्रतिनिधी)
प्र-कुलगुरूंना निवेदन....
जिल्हाधिकारी कार्यालयातून आंदोलनकर्ते शिवाजी विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी याठिकाणी देखील घोषणाबाजी केली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये ते थांबून राहिले. याठिकाणी
प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी कुलसचिव
डॉ. डी. व्ही. मुळे उपस्थित होते.