पट्टणकोडोलीत कोविड सेंटरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:32+5:302021-05-19T04:24:32+5:30

पट्टणकोडोली हे गाव जवळपास ३५ हजार लोकसंख्येचे आहे. गावालगत पंचतारांकित औद्यागिक वसाहत असून चांदी व्यवसायातून येथील ग्रामस्थांचा संपर्क मोठ्या ...

Demand for Kovid Center in Pattankodoli | पट्टणकोडोलीत कोविड सेंटरची मागणी

पट्टणकोडोलीत कोविड सेंटरची मागणी

पट्टणकोडोली हे गाव जवळपास ३५ हजार लोकसंख्येचे आहे. गावालगत पंचतारांकित औद्यागिक वसाहत असून चांदी व्यवसायातून येथील ग्रामस्थांचा संपर्क मोठ्या प्रमाणात आहे. गावामध्ये आजरोजी १०० च्या वर ग्रामस्थांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस गावामध्ये वाढतच आहे. मात्र रुग्णांना कोरोना संसर्गावर उपचार घेणे अवघड बनत आहेत. एक तर खासगी व शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध नाही. रुग्णांचे उपचारासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गावामध्ये कोविड सेंटरची गरज भासत आहेत. कोविड सेंटर व्हावे यासाठी गावातील पंचायत समिती सदस्य अरुण माळी प्रयत्न करीत आहेत. माजी उपसरपंच कृष्णात मसूरकर १ लाख ११ हजार एकशे ११ रुपयांची देणगी देण्याची तयारी दाखवली आहे. तर शिवसेना शहर प्रमुख आण्णासो जाधव यांनी १० बेड देण्याचे जाहीर केले आहे.

Web Title: Demand for Kovid Center in Pattankodoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.