शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

..मग ऑफलाईन परीक्षेचा अट्टहास का?, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 19:31 IST

६५ टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन पूर्ण झाला असताना ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टहास का?,

कोल्हापूर : जर दहावी-बारावीचा ६५ टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन पूर्ण झाला असताना ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टहास का?, अशी विचारणा विद्यार्थ्यांनी सोमवारी केली. त्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली. त्याबाबतचे निवेदन त्यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सत्यवान सोनवणे यांना दिले. 

या समितीच्या शिष्टमंडळासह सुमारे दोनशे विद्यार्थी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिक्षण मंडळाच्या परिसरात पोहोचले. त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी समितीच्या मागणीनुसार सचिव सोनवणे त्याठिकाणी आले. दि. ४ ऑक्टोबरपासून दहावी-बारावीच्या वर्गासाठी ऑफलाईन शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली.अशा परिस्थितीत केवळ दहा टक्के ऑफलाईन अभ्यासक्रमाच्या आधारे शिक्षण मंडळ ऑफलाईन परीक्षा घेणार आहे का? अभ्यासक्रम ऑनलाईन झाल्याने परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली. त्यावर हे निवेदन शासनाला पाठविण्यात येईल, अशी ग्वाही सोनवणे यांनी दिली. 

यावेळी अथर्व चौगले, प्रतीकसिंह काटकर, विराज पाटील, गौरी पोवार, संस्कृती पाटील, कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, लहूजी शिंदे, महेश जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीexamपरीक्षा