शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी.च्या कोल्हापूर आगारात ड्युटी लावायला पैसे, जेवणाची मागणी; वाहतूक अधिकाऱ्यांचे आगार व्यवस्थापकांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:13 IST

काहींनी परिवहन मंत्र्यांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या

कोल्हापूर : एस. टी.च्या कोल्हापूर आगारात ड्युटी लावण्यासाठी पैसे, जेवण, वस्तूंची मागणी केली जाते, अशी खळबळजनक तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आगाराचा कारभार सुधारावा अन्यथा गांभीर्याने नोंद घ्यावी लागेल, असा इशारा विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी वरिष्ठ आगार व्यवस्थापकांना पत्राव्दारे दिला आहे.दोन महिन्यांपूर्वी एसटी कामगार संघटनांनी या प्रकरणाबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यासह काही त्रस्त झालेल्या चालक आणि वाहकांनी विभागीय कार्यालय, पुणे प्रादेशिक विभाग, तर काहींनी परिवहन मंत्र्यांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. आगारात चालक - वाहकांना दररोजचे काम वाटप करणारे वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक, पर्यवेक्षकीय कर्मचारी यांच्याबाबतही तक्रारी झाल्या आहेत. या तक्रारींची आगार पातळीवर चौकशी आणि शहानिशा करून निराकरण गरजेचे होते. परंतु, तसे न झाल्याने याची दखल घेत बोगरे यांनी हे पत्र काढले आहे.

काहींच्या खात्यावर पैसे जमामर्जीनुसार ड्युटी लावण्यासाठी आगारातील काही अधिकारी पैसे घेतात, असा आरोप कर्मचारी संघटनांना कडून झाला होता. हे पैसे संबधित अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. संबंधित अधिकाऱ्यांच्या खात्याच्या चौकशीची मागणी चालक - वाहकांनी संघटनांच्या मेळाव्यात केली होती. पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून त्याबाबतच्या सूचना आल्याने विभागीय कार्यालयातील अधिकारी खडबडून जागे झाले आहेत.

काय आहेत तक्रारी

  • चालक - वाहकांसोबत नीट बोलत नाहीत
  • अरेरावीची भाषा
  • पक्षपातीपणा
  • गणवेशात नसतात
  • कामावर वेळेवर उपस्थित नाहीत
  • पैशाची, जेवणाची मागणी

सवलतीची मागणी

  • मर्जीतल्या चालक, वाहकांची मागणी
  • सेवाज्येष्ठता डावलून ड्युटी द्या
  • मुक्कामाच्या एसटीची ड्युटी
  • लांब पल्ल्याची सेवा नकोच

कोल्हापूर जिल्ह्यात आगार १२

  • एसटी संख्या - ६९०
  • चालक - १,२४३
  • वाहक - १,३११
  • चालक तथा वाहक - ३१८
  • एकूण - २,८६०

यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार संबधितांना कामात तत्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले आहे. सुधारणा न झाल्यास कारवाई केली जाणार आहे. - संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधिकारी