शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीवर वारस नोंद करण्यासाठी लाचेची मागणी, मंडलअधिकाऱ्यासह पंटरवर गुन्हा दाखल; पंटर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 15:08 IST

पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील मंडल अधिकारी यांच्यासह पंटर'वर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

कोल्हापूर : शेतजमिनीवर वारस नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील मंडल अधिकारी यांच्यासह पंटर'वर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मंडल अधिकारी संतोष सांगडे व पंटर मुबारक उस्मान मुजावर (रा. विशाळगड) अशी या दोघांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी याबाबत माहिती दिली.याबाबत माहिती अशी की, आंबा परिसरातील शेतजमिनीला वारस नोंदीसाठी तक्रारदाराने मंडलअधिकारी संतोष सांगडे यांच्याकडे अर्ज केला होता. मुबारक मुजावर (पंटर) यांच्याकरवी त्यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. गोपनिय चौकशीत लाचेची मागणी केल्याचे पुढे आले. याबाबतची पडताळणी १८ ते १९ एप्रिल २०२२ दरम्यान करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.२०) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.यातील मुबारक मुजावर यास लाचलुचपत विभागाने अटक करून शाहूवाडी पोलिस ठाण्याकडे पुढील तपासासाठी हजर केले. मुख्य संशयित सांगडे यास लवकरच ताब्यात घेतले जाईल. असेही उपअधीक्षक बुधवंत यांनी स्पष्ट केले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधिक्षक (पुणे) राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, सहायक फौजदार संजीव बंबरगेकर, पोलिस नाईक विकास माने, सुनील घोसाळकर, रुपेश माने, सुरज अपराध, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण