शिक्षण संस्थांच्या शाळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:43+5:302021-09-26T04:26:43+5:30

येथील शाळेत ७ वर्गांसाठी केवळ ३ शिक्षिका कार्यरत आहेत. त्यामुळे शिक्षणावर अनिष्ट परिणाम होत आहे. मुख्याध्यापक सेवानिवृत्तीच्या अंतिम टप्प्यात ...

Demand for filing of offenses against schools of educational institutions | शिक्षण संस्थांच्या शाळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिक्षण संस्थांच्या शाळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

येथील शाळेत ७ वर्गांसाठी केवळ ३ शिक्षिका कार्यरत आहेत. त्यामुळे शिक्षणावर अनिष्ट परिणाम होत आहे. मुख्याध्यापक सेवानिवृत्तीच्या अंतिम टप्प्यात असल्याने सतत रजेवर जात आहेत. त्यामुळे पटसंख्या कमी होत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व पालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी सरपंच उषा जाधव होत्या. सभापती पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी काँ. संपत देसाई म्हणाले, पदाधिकारी शाळा वाचविण्यात कमी पडत आहेत. वेळप्रसंगी पंचायत समितीला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल.

पंचायत समिती सदस्य उदय कोडक म्हणाले, जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या संस्थांच्या शाळा असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याचे षड्यंत्र चालू आहे. सर्वसामान्य गरीब लोकांना याचा त्रास होणार आहे. त्यामुळे सध्या चालू असलेल्या या शाळांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

चर्चेत सभापती पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा सावंत, संतोष नावलकर, काका देसाई, कविता नाईक, सुप्रिया पाटील यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी सदस्य नंदा कांबळे, विक्रम लोखंडे, रोहिणी देसाई, वीणा रेळेकर, बबन देसाई, दत्तात्रय देसाई यांच्यासह पालक उपस्थित होते.

चौकट :

तालुक्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ज्या शाळेत शिक्षक संख्या कमी आहे. त्याठिकाणी शिक्षक देण्यासंदर्भात बैठक घेऊन तजवीज करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.

उदयराज पवार, सभापती, आजरा पंचायत समिती.

Web Title: Demand for filing of offenses against schools of educational institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.