‘बकरी ईद’निमित्त ड्रायफु्रटला मागणी
By Admin | Updated: October 6, 2014 22:36 IST2014-10-05T23:44:45+5:302014-10-06T22:36:38+5:30
साप्ताहिक बाजारभाव : दोडका, मिरची, वांग्याचे दर उतरले

‘बकरी ईद’निमित्त ड्रायफु्रटला मागणी
कोल्हापूर : नवरात्र सणानंतर आता बाजारात बकरी ईदनिमित्त ड्रायफु्रटला जास्त, विशेषत: मुस्लिम बांधवांकडून, मागणी होत आहे; तर दुसरीकडे भाज्यांच्या दरांत घसरण, फळांचे दर घसरले आहेत, कोथिंबिरीची आवक वाढली आहे. तिचा प्रतिपेंढीचा दर घाऊक बाजारात सहा रुपये झाला आहे. एकंदरीत, बाजारात ग्राहकांची गर्दी कमी दिसून येत होती.
भाज्यांचे दर उतरले; पण... --दोडका, हिरवी मिरची, वांग्याचे प्रतिकिलो दर ६० रुपयांवरून ४० रुपयांवर आले. तसेच गवार तब्बल ८० रुपयांवरून ५० रुपये झाली आहे. त्याचबरोबर फ्लॉवर, दुधी भोपळा ४० रुपयांवरून निम्म्या किमतीवर आला आहे. मात्र, बाजारात ग्राहकांच्या भाजी खरेदीसाठी गर्दी दिसून येत नव्हती.
ड्रायफु्रटचे दर -काजू (तुकडे) ४६० रुपये प्रतिकिलो, पूर्ण काजू ७०० रुपये, बदाम ७३० रुपयांवरून ८०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. शेवया प्रतिकिलो शंभर रुपये, इलायची एक तोळा (दहा ग्रॅम) १५ रुपये, दालचीन चार रुपये तोळा, खारीक (काळी) २८० रुपये, तर पांढरी १४० रुपये प्रतिकिलो आहे. विशेषत: बकरी ईद असल्याने ड्रायफु्रटला मागणी होती.
कांदा आवक वाढली; पण दर स्थिर -बाजारात कांद्याचा प्रतिकिलो दर १४ रुपये आहे. बटाटा २४ रुपये, लसूण ४५ रुपये आहे. या मालाची आवक वाढली; पण दर स्थिर राहिले आहेत.