हलकर्णीत्र पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:12+5:302021-07-03T04:16:12+5:30
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे गेल्या दोन महिन्यांपासून पशुवैद्यकीय सेवा कोलमडली आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी पी. एन. कांबळे कोरोनाबाधित झाल्याने ...

हलकर्णीत्र पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे गेल्या दोन महिन्यांपासून पशुवैद्यकीय सेवा कोलमडली आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी पी. एन. कांबळे कोरोनाबाधित झाल्याने ते २० मेपासून कामावर नसल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद आहे. तसेच जिल्हा दूध संघाची सेवा ही मर्यादित वेळेत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
हलकर्णी परिसरात मोठा दुग्ध व्यवसाय आहे. त्यामुळे येथे जनावरांची संख्याही अधिक आहे. गावचा विस्तार, गावातील संस्था याचा विचार करता संबंधित डॉक्टर यांना ‘गोकुळ’नेही पूर्णवेळ थांबण्याची सक्ती करणे गरजेचे आहे. जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यांची सोय होईल.
गेल्या दीड महिन्यापासून जिल्हा परिषदची पशुवैद्यकीय सेवा बंद असून ती पूर्ववत व पूर्णवेळ करावी, अशी येथील शेतकरी दूध उत्पादकांची मागणी आहे.