आशा सेविका मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:26+5:302021-07-08T04:17:26+5:30

काल येथील सेविका संपदा साताप्पा पाटील यांनी कोविड लसीकरणाची माहिती आपल्याला दिली नाही, असा आरोप करून नंदा ...

Demand for action in Asha Sevika beating case | आशा सेविका मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी

आशा सेविका मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी

काल येथील सेविका संपदा साताप्पा पाटील यांनी कोविड लसीकरणाची माहिती आपल्याला दिली नाही, असा आरोप करून नंदा कांबळे यांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. येथील लसीकरणासाठी १०० डोस उपलब्ध झाले होते. त्यामुळे अन्य लोकांना लस मिळाली नव्हती. यातून हा प्रकार झाला होता.

याविरोधात आज तालुक्यातील आशा सेविकानी काम बंद आंदोलन केले. तालुका अध्यक्ष पद्मा दुर्गुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले. या वेळी शुभांगी बेलेकर, सीमा पाटील, मधुरा पाटील, आशा पाटील, रेखा पाटील, दया कांबळे, रूपाली जाधव, संगीता रानमाळे, अनिता कांबळे यांच्यासह तालुक्यातील सर्व आशा सेविका उपस्थित होत्या.

Web Title: Demand for action in Asha Sevika beating case