पोलीस अधिकारी दिनेश काशीद यांच्यावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:27+5:302021-09-12T04:29:27+5:30

कोल्हापूर : सातवे (ता. पन्हाळा) येथील शिवतेज घाटगे याच्या खूनप्रकरणात कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. दिनेश काशीद यांनी ...

Demand for action against police officer Dinesh Kashid | पोलीस अधिकारी दिनेश काशीद यांच्यावर कारवाईची मागणी

पोलीस अधिकारी दिनेश काशीद यांच्यावर कारवाईची मागणी

कोल्हापूर : सातवे (ता. पन्हाळा) येथील शिवतेज घाटगे याच्या खूनप्रकरणात कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. दिनेश काशीद यांनी राजकीय दबावाला बळी पडून पक्षपातीपणा करून संशयित आरोपींना मदत केली, तसेच शिवतेजचा मृत्यूपूर्व जबाब जाणून-बुजून नोंदवला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मृत शिवतेजचे चुलते संदीप ज्ञानदेव घाटगे व गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे पो. नि. तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले की, शिवतेज व संबंधित मुलगी हे दोघे सहमतीने पळून गेले होते. त्यांना आम्ही शोधून आणून कोडोली पोलिसात हजर केले. त्यावेळी बालसुधारगृहात फक्त शिवतेजला ठेवले. वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली आणून सहा. पो. नि. काशीद हे त्याला वारंवार मारत होते, त्याला मोबाइलमधील पुरावे नष्ट करण्यास भाग पाडले. आम्हाला न्याय देण्याऐवजी काशीद हे संशयित आरोपी दळवी यांच्या घरी व फार्महाऊसवर जाऊन पार्टी करत होते. त्यातून काशीद यांनी घाटगे कुटुंबीयांना त्रास दिला. बुधवारी संशयितांनी शिवतेजला उचलून नेल्याचे कळूनही काशीद गप्पच राहिले. तसेच जखमी शिवतेजचा मृत्यूपूर्व जबाब घेण्याऐवजी त्यांनी हद्दीचा प्रश्न पुढे करत आरोपींला मदतीच्या उद्देशाने वेळकाढूपणा केला. त्यामुळे संबंधित काशीद यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळामध्ये संदीप घाटगे, परिक्षित घाटगे, वैभव घाटगे, सुनील घाटगे, जगन्नाथ घाटगे, संजय घाटगे, प्रवीण घाटगे, चंद्रकांत घाटगे आदींचा समावेश होता.

फोटो नं. ११०९२०२१-कोल-क्राईम०२

ओळी : सातवे (ता. पन्हाळा) येथील शिवतेज घाटगे याच्या खूनप्रकरणी तपासात पक्षपातीपणा करणाऱ्या कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि, दिनेश काशीद यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सातवे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे पो. नि. तानाजी सावंत यांना निवेदन दिले.

110921\11kol_4_11092021_5.jpg

ओळी : सातवे (ता. पन्हाळा) येथील शिवतेज घाटगे याच्या खूनप्रकरणी तपासात पक्षपातीपणा करणार्या कोडोली पोलीस ठाण्याचे सहा, पो. नि, दिनेश काशीद यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सातवे ग्रामस्थांच्या शिष्ठमंडळाने कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे पो. नि. तानाजी सावंत यांना निवेदन दिले.

Web Title: Demand for action against police officer Dinesh Kashid