गॕस वितरणाच्या कामकाजाची वेळ १२ तास करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:34+5:302021-05-19T04:24:34+5:30
कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील गॅस वितरकांच्या आस्थापनांनी सकाळी ६ ते दुपारी १२ या ...

गॕस वितरणाच्या कामकाजाची वेळ १२ तास करण्याची मागणी
कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील गॅस वितरकांच्या आस्थापनांनी सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेतच गॅस सिलिंडरचे वितरण करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. यापूर्वी ही वेळ सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ते ७ अशी होती.
वेळ कमी आणि मागणी व पुरवठा अधिक असल्याने या वेळेत काम करायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सिलिंडरची घरपोच सेवा देणे, रिकामे सिलिंडर परत आणणे, ऑनलाइन नोंदी करणे, बिलाची रक्कम स्वीकारणे व ती बँक खात्यावर जमा करणे ही सर्व कामे या नवीन वेळेत करणे शक्य होत नाहीत.