रमणीय माचाळ गाव पर्यटकांना खुणावतेय

By Admin | Updated: August 7, 2014 00:19 IST2014-08-06T23:22:20+5:302014-08-07T00:19:27+5:30

स्वप्नातलं गाव : खळाळणारे झरे, दाट धुके अन् नागमोडी वाटा...

The delightful Machil village is famous for tourists | रमणीय माचाळ गाव पर्यटकांना खुणावतेय

रमणीय माचाळ गाव पर्यटकांना खुणावतेय

भांबेड : लांजा तालुक्यातील माचाळ हे गाव पर्यटनस्थळ म्हणून घोषित असून, पावसाळ्यात हे गाव पर्यटकांना खुणावत आहे.
हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचा रस्ता, परिसरात पूर्णपणे धुके, थंड वातावरण, कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टीनी वेढलेले माचाळ हे गाव पर्यटकांना खुणावते आहे. अनेक पर्यटक या सर्वांचा आनंद लुटताना दिसत आहेत.
कोकण रेल्वेच्या विलवडे व आडवली स्थानकापासून २० किलोमीटर अंतरावर लांजा व साखरपा बसस्थानकापासून ३० किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसलेले माचाळ हे गाव थंड हवेचे ठिकाण आहे. येथील वातावरण थंड, अल्हाददायक असे आहे.
३०० ते ४०० लोकवस्तीचे हे गाव आहे. येथील घरे कौलारु, डोंगर उताराची व मातीची आहेत. पावसाळ्यात येथे कायम धुके असते. त्यामुळे घरांच्या चहूबाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी करावी लागते. गावाकडे जाण्यासाठी चिंचुर्टी गावापर्यंत रस्ता आहे. त्यापुढे नागमोडी वळणाच्या पायवाटा आहेत. पावसाळ्यात या वाटांनी चालताना सुखद अनुभव येतो. गडद धुके, खळाळणारे पाणी, हिरवीगार झाडी अशा वातावरणाचा आनंद घेताना थकवा जाणवत नाही. डोंगरमाथ्यावर गेल्यावर समोर खोल दरी, चहुबाजूनी धुक्याचा आनंद घेता येतो.अनेक पर्यटक व संस्थाही पावसाळ्यात सहलींचा आनंद घेताना दिसत आहेत. लांजा तालुक्यातील अमोल रंगयात्रीनेही या ठिकाणी सहलीचे नियोजन केले होते. सुंदर निसर्ग, खळाळणारे पाणी, दाट धुके, नागमोडी वाटा, अतिशय नयनरम्य परिसर पाहण्याजोगा असल्याचे अमोल रंगयात्रीचे संस्थापक अमोल रेडीज यांनी सांगितले. पावसाळा सुरु असल्याने पर्यटक माचाळ पर्यटन स्थळाला भेट देऊन आनंद घेत आहेत. (वार्ताहर)

कोकण रेल्वेच्या विलवडे व आडवली स्थानकापासून २० किलोमीटर अंतरावर लांजा व साखरपा बसस्थानकापासून ३० किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसलेले माचाळ.
ृमाचाळकडे जाण्यासाठी चिंचुर्टी गावापर्यंत रस्ता

Web Title: The delightful Machil village is famous for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.