त्या खांबावरील विद्युत कनेक्शन हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:16+5:302021-01-08T05:21:16+5:30
जयसिंगपूर : येथील शाहूनगर जय महाराष्ट्र चौक ते शाळा नं. ९ या मार्गावर मध्यभागी असणाऱ्या धोकादायक खांबावरील विद्युत कनेक्शन ...

त्या खांबावरील विद्युत कनेक्शन हटविले
जयसिंगपूर : येथील शाहूनगर जय महाराष्ट्र चौक ते शाळा नं. ९ या मार्गावर मध्यभागी असणाऱ्या धोकादायक खांबावरील विद्युत कनेक्शन हटविण्याचे काम महावितरणने सोमवारपासून सुरू केले आहे. याबाबत नागरिकांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन खांब हटविण्याची मागणी केली होती.
या रस्त्याला रोड डिव्हायडर नसल्यामुळे विद्युत खांब खुलेच असल्याने रात्रीच्या वेळी हे खांब दिसत नसल्याने वारंवार वाहनांचे अपघात होत होते. त्यामुळे बरेच खांब वाकलेले आहेत. खांबावरील रस्त्याच्या कडेला लावलेले डी.पी.चे दरवाजे खुलेच असतात. त्यामुळे लहान मुले व नागरिकांच्या जीवितास हानी होण्याची शक्यता असल्याने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन दरवाजे दुरुस्त करून घ्यावेत, अशा मागणीबरोबरच रस्त्याच्या मध्यभागी असलेले खांब हटवावेत, अशीदेखील मागणी नागरिकांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने धोकादायक खांबावरील विद्युत कनेक्शन हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
फोटो - ०४०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील धोकादायक खांबावरील विद्युत कनेक्शन हटविण्याचे काम महावितरणकडून सुरू होते.