पडसाळी पैकी चव्हाणवाडी येथील धोकादायक डीपी हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:06+5:302021-01-23T04:25:06+5:30
चव्हाणवाडी गावातून तेहतीस के.व्ही.च्या विद्युत वाहिनीचे पोल गेले आहेत. त्याची मेन डीपी ही गावात असून, तिच्या सभोवती वस्ती आहे. ...

पडसाळी पैकी चव्हाणवाडी येथील धोकादायक डीपी हटवा
चव्हाणवाडी गावातून तेहतीस के.व्ही.च्या विद्युत वाहिनीचे पोल गेले आहेत. त्याची मेन डीपी ही गावात असून, तिच्या सभोवती वस्ती आहे. सदरची विद्युत डीपी ही खराब झालेली असून, उघड्यावर आहे. तिच्या शेजारी गावातील लहान मुले खेळतात. त्यामुळे भविष्यात या डीपीमुळे धोका होण्याची शक्यता आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ही डीपी गावाबाहेर स्थलांतरित करावी, अशी सरपंच पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने मागणी केली आहे. येथील ३३ के.व्ही.च्या विद्युत वाहिनीचे पोल व डीपीचे गावाबाहेर स्थलांतर करावे, अशी ग्रामस्थांनी यापूर्वी संबंधितांकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे, असेही सरपंच पाटील यांनी सांगितले.
फोटो
कोलडेस्कवर पाठवला आहे.